आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Amitabh Bachchan, Ranbir Kapoor, Alia Bhatt, Priyanka Chopra, Rajnikanth And Other Stars Come Together For A Short Film Amid Coronavirus Lockdown

शॉर्ट फिल्म:घरातून बाहेर न पडता हिंदी, मराठी, पंजाबी, बंगाली, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांनी शूट केली फिल्म, दिला सोशल डिस्टेंसिंगचा संदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या शॉर्ट फिल्मची शूटिंग सर्व कलाकारांनी आपापल्या घरात राहून केली आहे.

कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाने संपूर्ण जग हैराण झाले आहे. याकाळात सर्वजण आपापल्या परीने लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. अशातच सोनी पिक्चर्स नेटवर्कने एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. यात अमिताभ बच्चन, रजनीकांत, मोहनलाल, चिरंजीवी, ममुटी, प्रियांका चोप्रा, रणबीर कपूर, आलिया भट, दिलजित दोसांझ, प्रोसेनजित चटर्जी, सोनाली कुलकर्णी आणि शिवराज कुमार यांच्या भूमिका असून ते या फिल्मच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. विशेष म्हणजे या शॉर्ट फिल्मची शूटिंग सर्व कलाकारांनी आपापल्या घरात राहून केली आहे. लोकांना घरात राहण्याचा संदेश देणे आणि रोजंदारी कामगारांच्या मदतीसाठी निधी गोळा करणे हे या शॉर्टफिल्मचे मुख्य उद्दीष्ट आहे.

  • बिग बी म्हणाले - हे संकट टळेल

अमिताभ बच्चन यांनी ही शॉर्ट फिल्म आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. यासह त्यांनी लिहिले, "जेव्हा विषय देशहिताचा असेल आणि आपला संकल्प आपल्या स्वप्नापेक्षा मोठा असेल. तर पुन्हा आमच्या चित्रपटसृष्टीतील सहकलाकार आणि मित्रांसाठी हा ऐतिहासिक प्रयत्न! आम्ही एक आहोत.. टळेल, संकटाचा काळ जाईल! नमस्कार! जय हिंद! " चित्रपटातील सर्व कलाकार आपापली मातृभाषा बोलताना दिसत आहेत.

  • ही चित्रपटाची कहाणी आहे

या चित्रपटाची कहाणी अमिताभ बच्चन यांच्याभोवती फिरत आहे, ज्यांचे काळा चष्मा हरवला आहे. ते पत्नीला आवाज देतात. पण उत्तर येत नाही. पण दिलजीत दोसांझ त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या चष्म्याचा शोध घेऊ लागतो. अशाप्रकारे, रणबीर कपूर, आलिया भट, रजनीकांतसह इतर स्टार्स चष्म्याचा शोध घेतात आणि हा शोध प्रियांका चोप्रावर संपतो. ती बिग बींना त्यांच्या चष्मा आणून देते. 

  • शेवटी बिग बींचा संदेश

व्हिडिओच्या शेवटी, अमिताभ हा संदेश देतात - "हा चित्रपट बनवण्यासाठी कोणताही कलाकार घराबाहेर पडला नाही. या सर्वांनी त्यांच्या प्रांतात, त्यांच्या शहरात, त्यांच्या घरी राहून शूटिंग केली आहे. कोणीही घराबाहेर पडले नाही. घरी रहा, बाहेर जाऊ नका. कारण तरच तुम्ही या भयानक कोरोना आजारापासून सुरक्षित राहाल. घरी रहा, सुरक्षित राहा."

  • प्रसून पांडे यांची संकल्पना

कलाकारांनी तयार केलेल्या या शॉर्टफिल्मचे नाव ‘फॅमिली’ असं असून प्रसून पांडे यांच्या कल्पनेमधून ही शॉर्टफिल्म तयार झाली आहे. या फिल्मचे वैशिष्ट म्हणजे यात दाक्षिणात्य कलाकारांपासून ते मराठी कलाकारांपर्यंत अनेक सेलिब्रिटी झळकले आहेत. इतकंच नाही तर हे कलाकार मंडळी या फिल्मसाठी एकमेकांना भेटले नसून त्यांनी त्यांच्याच घरी राहून या फिल्ममध्ये सहभाग घेतला आहे. मात्र ही फिल्म पाहिल्यानंतर या कलाकारांनी एकमेकांपासून दूर राहून हे चित्रीकरण केलंय यावर विश्वास बसणार नाही.

बातम्या आणखी आहेत...