आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गुड बाय'चा फर्स्ट लूक आऊट:अमिताभ बच्चन-रश्मिका मंदाना पहिल्यांदाच एकत्र दिसणार, यावर्षी 7 ऑक्टोबरला रिलीज होणार चित्रपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आगामी 'गुड बाय' चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये बिग बी पतंग उडवताना दिसत आहेत. दुसरीकडे, रश्मिका मंदाना त्यांच्या मागे चक्री घेऊन उभी दिसतेय. या चित्रपटातून बिग बी आणि रश्मिका पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. निर्मात्यांनी फर्स्ट लूक पोस्टर शेअर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.

'गुड बाय' यावर्षी 7 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे

चित्रपटाचे हे पोस्टर शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले, 'कुटुंब ही सर्वात खास गोष्ट आहे. जेव्हा कुणी जवळ नसतं, तेव्हा भासते त्यांची उणीव. गुड बाय 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.' बिग बींच्या या कॅप्शनवरून हा कौटुंबिक चित्रपट असेल याचा अंदाज बांधता येतो.

अमिताभ बच्चन यांची सोशल मीडिया पोस्ट.
अमिताभ बच्चन यांची सोशल मीडिया पोस्ट.

या चित्रपटात नीना गुप्ता देखील दिसणार आहे

अमिताभ आणि रश्मिकाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला असून या चित्रपटात अमिताभ आणि रश्मिका यांच्यासह नीना गुप्ताही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातून नीना पहिल्यांदाच अमिताभ यांच्यासोबत दिसणार आहे. ही पोस्ट पाहून या चित्रपटात अमिताभ रश्मिकाच्या वडिलांची भूमिका साकारत असल्याचा अंदाज बांधता येतो. त्याचबरोबर नीना गुप्ता तिच्या आईच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.. या चित्रपटातून रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

अमिताभ बच्चन आणि रश्मिका यांचे आगामी प्रोजेक्ट्स

रश्मिका 2021 मध्ये आलेल्या 'पुष्पा' चित्रपटातील तिच्या दमदार व्यक्तिरेखेसाठीही ओळखली जाते. या चित्रपटानंतर तिने टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. 'गुड बाय' व्यतिरिक्त ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' आणि रणबीर कपूरसोबत 'एनिमल'मध्ये दिसणार आहे. तर अमिताभ बच्चन 'ब्रह्मास्त्र'मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...