आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना काळात चित्रीकरण:अमिताभ बच्चन-रश्मिका मंदाना आणि विकी कौशल-भूमी पेडणेकर शूटिंगसाठी सज्ज; लवकरच सुरू करणार आपापल्या फिल्मचे शूटिंग

अमित कर्ण6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शूटिंग सुरू करण्याआधी सर्वच प्रॉडक्शन हाऊसचा लसीकरणावर भर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मनोरंजन जगत अधिक अलर्ट झाले आहे. साजिद नाडियादवालापासून ते यशराज, धर्मा, अॅक्सेलसहित अनेक निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊस युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवत आहेत. सिने वर्कर आणि दिग्दर्शकांच्या संघटनादेखील आपल्या आणि इतरांच्या सदस्यांचे लसीकरण करून घेत आहेत. निर्माते आनंद पंडित यांनी तर लसीकरण सेंटरदेखील उघडले आहे. एकूणच लसीकरण मोहीम राबवून शूटिंग सुरू करण्याचा सर्वांचा उद्देश आहे. याचा चांगला परिणामही समोर येत आहे. एकापाठोपाठ एक मोठ्या बजेटचे चित्रपट आणि कलाकार शूटिंग सुरू करत आहेत.

दोन्ही चित्रपटांचे शूटिंग एक ते दीड महिना चालेल
व्यापार विश्लेषकांनुसार बुधवारपर्यंत अक्षयकुमार, सैफ अली खान, प्रभास आणि आलिया भट्ट यांच्या चित्रपटांचे काम प्रगतिपथावर आहे. आता अमिताभ बच्चन, रश्मिका मंदाना, विकी कौशल आणि भूमी पेडणेकरसारख्या कलाकारांनीदेखील पूर्ण तयारी केली आहे. एकीकडे विकी आणि भूमी लॉकडाऊनच्या आधीपासून 'डॉक्टर लेले'चे शूटिंग करत अ‍ाहेत आणि याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता ते बरे होऊन पुन्हा शूटिंग सुरू करणार आहेत. दुसरीकडे अमिताभ आणि रश्मिका पुन्हा एकदा 'गुड बाय’चे शूटिंग सुरू करणार आहेत. दोन्ही चित्रपटांचे शूटिंग मुंबईत एक ते दीड महिन्यापर्यंत मुंबईच्या चांदिवली स्टुडिओमध्ये होणार आहे.

निवृत्त अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार अमिताभ
दुसरीकडे अमिताभ आणि रश्मिकादेखील इनडोअर शूटिंग करणार आहेत. 'गुडबाय’ कौटुंबिक चित्रपट आहे. त्यामुळे त्याचे शूटिंग इनडोअरच होणार आहे. अमिताभ यात एका निवृत्त अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. रश्मिका त्यांच्या मुलीच्या भूमिकेत आहे, तर नीना गुप्ता अमिताभ यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लॉकडाऊनच्या आधी या चित्रपटाच्या सेटवर 20 ते 25 लोकांच्या पॉझिटिव्ह होण्याची बातमी होती. मात्र अाता सर्वांनीच लस घेतली आहे.

'डॉक्टर लेले’चे शीर्षक बदलणार
भूमी आणि विकी यांच्या भूमिका असलेल्या 'डाॅक्टर लेले' यांच्या चित्रपटाविषयी आणखी एक बातमी समोर आली आहे. डॉक्टर लेले हे या चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक आहे, ते बदलण्यात येईल. खरं तर, कथेत विकी किंवा भूमी दोघांच्याही डॉक्टरांच्या भूमिका नाहीत. त्यामुळे याचे शीर्षक बदलण्यात येणार आहे. यासाठी अनेक पर्यायांवर विचार करण्यात येत आहे. सध्या घराच्या इंटिरिअरच्या दृश्यावर काम सुरू आहे. त्यामुळे विकी आणि भूमी इनडोअर शूटिंग करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...