आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवण:'बंटी और बबली'ची 15 वर्षे... अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाची आठवण काढत लिहिले - अभिषेकसोबतचा हा माझा पहिला चित्रपट होता

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बंटी और बबली'च्या सिक्वेलमध्ये अभिषेक दिसणार नाहीये. त्याच्याऐवजी सैफ अली खानची वर्णी लागली आहे.

अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी स्टारर ‘बंटी और बबली’ चित्रपटाला रिलीज होऊन 15 वर्षे झाली आहेत. ऐश्वर्या रायनेही या चित्रपटातील 'कजरा रे' गाण्यात खास भूमिका साकारली होती. बिग बींनी सोशल मीडियावर या चित्रपटाची आठवण काढत सांगितले की मुलगा अभिषेकसोबतचा त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता.

अमिताभ यांनी 'बंटी और बबली' चे एक पोस्टर आणि अभिषेक- ऐश्वर्यासोबतचा स्टेज शोचा परफॉर्मन्सचा  फोटो शेअर केला आणि लिहिले, "15 वर्षे... बंटी और बबली... अभिषेकसोबतचा माझा पहिला चित्रपट... खूप मजा केली… आणि काय टीम होती… आणि ‘कजरा रे’…  आमच्या सर्व स्टेज शोमध्ये याचे सादरीकरण व्हायचे.”

2005 मध्ये झाला होता रिलीज

शाद अली दिग्दर्शित हा चित्रपट 27 मे 2005 रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कहाणी बंटी (अभिषेक बच्चन) आणि बबली (राणी मुखर्जी) या दोन चोरांभोवती फिरते. या चित्रपटात अमिताभ यांनी डीसीपी दशरथ सिंहची भूमिका साकारली होती, ज्यांच्यावर बंटी आणि बबली यांना पकडण्याची जबाबदारी असते. 'बंटी और बबली' व्यतिरिक्त अमिताभ आणि अभिषेक यांनी 'सरकार', 'कभी अलविदा ना कहना' आणि 'पा' सारख्या चित्रपटांमध्ये स्क्रिन शेअर केली.  

सिक्वेलमध्ये अभिषेक दिसणार नाही

'बंटी और बबली'चा सिक्वेलही जवळपास पूर्ण झाला आहे. यात अभिषेकऐवजी सैफ अली खान बंटीची भूमिका साकारत आहे. वरुण व्ही. शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी, अक्षय कुमार आणि शरबरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...