आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फंड रेझिंगवर अमिताभ बच्चन यांचे मत:बिग बी म्हणतात - 'मदतनिधीसाठी पैसे मागणे, लोकांना पैसे जमा करायला सांगणे, हे मला पटत नाही'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी किती मदत करतो हे कधीच सांगत नाही

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर अॅक्टिवर असतात. या माध्यमातून ते आपल्या मनातील भावना चाहत्यांसोबत शेअर करतात. अलीकडेच त्यांनी ब्लॉगमध्ये फंड रेझिंगसंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, की निधी गोळा करणे खरंच कौतुकास्पद आहे, मात्र मी कधीही हे स्वतःहून सुरु करणार नाही. कारण दुस-यांकडे पैसे मागणे मला लाजिरवाणा वाटते.

मी किती मदत करतो हे कधीच सांगत नाही
बिग बी लिहितात, 'मी कशी आणि किती मदत करतो, ते मी कधीच कुणाला सांगत नाही. कारण तो माझा स्वभाव नाही. मी गेल्या अनेक आठवड्यांपासून मदत करत आहे. इतकंच नव्हे, तर मदतनिधीसाठी पैसे मागणे, लोकांना पैसे जमा करायला सांगणे, हे व्यक्तिश: मला पटत नाही. म्हणून मी मला जमेल, झेपेल तशी मदत करत असतो. आता मी किती मदत दिली? हे सांगणं मला योग्य वाटत नाही. पण एक नक्की आहे, एखादी मदतीची कॅम्पेन राबवल्यानंतर जेवढा निधी जमेल तेवढी मी मदत करत आहे.'

मी कुठेही निधी मागत नाही - बच्चन
आपल्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, "मी पब्लिक इंटरेस्टच्या अनेक जाहिराती केल्या. पण त्यात कुठेच मी निधी मागत नाही. कारण दुसऱ्यांकडे पैसा मागण्यापेक्षा आपणच मदत करावी असे मला वाटते. गेल्या काही दिवसांपासून मी किती मदत करतो. कशी मदत करतो, यावर खूप बोलले जातं आहे. म्हणून गैरसमज होऊ नये म्हणून मी हे लिहितो आहे." असेही बिग बी आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे, त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, गुडबाय, मेडे या चित्रपटांचा समावेश आहे. ते अनेक ब्रँड्सचे एंडोर्समेंटदेखील करतात. अलीकडेच केबीसी 13 च्या नोंदणी प्रक्रियेलादेखील सुरुवात झाली आहे. केबीसीचे 13 पर्वदेखील बिग बी होस्ट करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...