आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदर्स डे:अमिताभ बच्चन यांनी आईच्या स्मृतीत गायले गाणे,  'मेरी रोटी की गोलाई मां'द्वारे व्यक्त केल्या भावना 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे गाणे स्वत: अमिताभ यांनी त्यांच्या आवाजात गायले आहे.

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मदर्स डेच्या निमित्ताने आपल्या आई तेजी बच्चन यांचे स्मरण केले. रविवारी रात्री त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी 'मेरी रोटी की गोलाई मां' गाण्याच्या माध्यमातून आईबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. बच्चन कुटुंबाची जुनी छायाचित्रे या व्हिडिओ बघायला मिळत असून त्यापैकी बहुतेक छायाचित्रांमध्ये तेजी बच्चन दिसत आहेत.

हे गाणे स्वत: अमिताभ यांनी त्यांच्या आवाजात गायले आहे. गाण्याचे बोल पुनीत शर्मा यांचे असून संगीतकार अनुज गर्ग आहेत. गाण्यातील व्हिज्युअल अमिताभ बच्चन यांचे वैयक्तिक संग्रह आणि बिनानी सिमेंटच्या 2013 च्या 'पॅरेंटल लव्ह' या जाहिरातीमधून घेण्यात आले आहेत. त्याची मूळ आवृत्ती शुजित सरकार आणि त्यांच्या टीमने दिग्दर्शित केली होती, तीच ईएफ बुशरा यांनी रिक्रिएट केली आहे.

  • अमिताभ बच्चन यांनी गायलेल्या गीताचे बोल..

'मेरी रोटी की गोलाई मां, मेरे सच की सब सच्चाई मां स्वेटर वाली बुनाई मां, छांव से ज्यादा ठंडी कांच पर लगी बिंदी, डर लगता है जब रोती है मां ना होने पर भी होती है मां, लोरी जैसी कोमल मैं बच्चा वो आंगन, मेरी आंखों में भर आई मां... मेरी रोटी की गोलाई मां, मेरी रोटी की गोलाई मां'

View this post on Instagram

#HappyMothersDay

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on May 10, 2020 at 11:51am PDT

  • 13 वर्षांपूर्वी झाले तेजी बच्चन यांचे निधन

अमिताभ बच्चन यांच्या आई तेजी बच्चन यांचे खरे नाव तेजवंत कौर होते. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट  1914 रोजी तत्कालीन पंजाबमधील  लयलपूर शहरात (आताचे पाकिस्तान) झाला होता. त्या एक सामाजिक कार्यकर्ता आणि मानसशास्त्र प्राध्यापिका होत्या. लग्नाआधीपर्यंत त्यांनी लाहोरच्या खूबचंद डिग्री कॉलेजमध्ये शिकवले. 1941 मध्ये त्यांचे हरिवंश राय बच्चन यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना अमिताभ आणि अजिताभ ही दोन मुले आहेत. 21 डिसेंबर 2007 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...