आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:'पीकू'ला 5 आणि 'खुदा  गवाह'ला 28 वर्षे पूर्ण, अमिताभ बच्चन यांनी काढली इरफान खान आणि श्रीदेवीची आठवण 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बींनी इंस्टाग्रामवर एक कोलाज शेअर केला आहे.

8 मे रोजी अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या 'खुदा गवाह' आणि 'पीकू' या दोन चित्रपटांची रिलीज अॅनिव्हर्सरी होती. बिग बींनी उशीरा रात्री एक पोस्ट शेअर करुन या चित्रपटातील कलाकार जे आता या जगात नाहीत, त्यांना श्रद्धांजली वाहिली. बिग बींना 'पीकू'मधील त्यांचा सह-अभिनेता इरफान खान आणि 'खुदा खवाह'मधील सह-अभिनेत्री श्रीदेवीची आठवण झाली. अनुक्रमे 29 एप्रिल 2020 आणि 24 फेब्रुवारी 2018 रोजी या दोन्ही कलाकारांचा मृत्यू झाला.

बिग बींनी इंस्टाग्रामवर एक कोलाज शेअर केला आहे, ज्यामध्ये श्रीदेवीसोबत 'खुदा गवाह'चा एक सीन आहे आणि दुसर्‍यामध्ये ते इरफान खान आणि दीपिका पदुकोणसमवेत' पीकू'च्या सीनमध्ये दिसत आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "आज 8 मे रोजी 'खुदा गवाह'ला 28 वर्षे आणि 'पीकू'ला 5 वर्षे पूर्ण झाली. त्या दोघांच्या (श्रीदेवी आणि इरफान) आठवणीत, जे आम्हाला सोडून निघून गेले."

'खुदा गवाह'च्या दिग्दर्शकाचेही केले स्मरण

बिग बींनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दोन्ही चित्रपटांशी संबंधित लोकांना श्रद्धांजली वाहिली आहेत. श्रीदेवी आणि इरफान व्यतिरिक्त त्यांनी 'खुदा गवाह'चे दिग्दर्शक मुकुल एस. आनंद ज्यांचे 7 सप्टेंबर 1997 रोजी निधन झाले होते, त्यांचेही स्मरण केले. बिग बींनी लिहिले की, "दिग्दर्शक मुकुल एस. आनंद आम्हाला खूप आधी सोडून गेले. त्याच्या नजरची जादू... त्याचे डोळे जादुई कॅमेर्‍याचे लेन्स होते. अगदी दीर्घ काळानंतरही त्यांनी ज्या फ्रेम्स शूट केल्या, त्या विलक्षण होत्या."

'खुदा गवाह' आणि 'पीकू'चा अनुभव केला शेअर

अमिताभ यांनी 'खुदा गवाह' आणि 'पीकू' संबंधित अनुभव आपल्या ब्लॉगमध्ये शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले, "खुदा गवाहची शूटिंग अफगाणिस्तानात करण्यात आली होती आणि त्यासंबंधीचे तपशील सांगण्यासाठी एका पुस्तकाची गरज पडेल. आशा करतो की, नंतर त्याविषयी सविस्तर बोलू... आणि पिकू... प्रत्येक दिवस इन्वेटिंग... तो  घालवण्यात गेला, जे लिहिलेले किंवा वर्णन केलेले नाही. पण अनुभवले. ते करत होतो, जे कोलकात्यात यापूर्वी कधीही केले नव्हते... रस्त्यावर सायकल चालवणे."   

बातम्या आणखी आहेत...