आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Amitabh Bachchan Requests Globally To Help India Fight Against Covid 19 Also Gave 2 Crore For Covid Care Facility At Rakab Ganj Gurudwara In Delhi

बिग बींची अपील आणि मनाचा मोठेपणा:अमिताभ बच्चन म्हणाले - कोरोनाशी लढा देण्यासाठी भारताची मदत करा, स्वतः कोविड सेंटरला केली 2 कोटींची मदत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभ म्हणाले की, कोरोनाशी एकत्र येऊन लढा देऊया

अमिताभ बच्चन यांनी रविवारी आपल्या सोशल मीडियावर वॅक्स लाइव्ह इव्हेंटची एक झलक शेअर केली, यात त्यांनी कोरोनोशी लढा देत असलेल्या भारताला मदत करण्याचे आवाहन केले आहे. या जागतिक कार्यक्रमाच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये 78 वर्षीय अमिताभ म्हणाले की, या प्राण घातक विषाणूविरूद्ध लढण्यासाठी जगाने भारताची मदत करावी.

अमिताभ म्हणाले, कोरोनाशी एकत्र येऊन लढा देऊया
अमिताभ यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून लसीचे महत्त्व यावर जोर दिला आहे. बच्चन यांनी लिहिले - लसीकरण हा कोरोनाला पराभूत करण्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणून सामील व्हा आणि
ग्लोबल सिटीझनला पाठिंबा द्या याची भारताला गरज आहे. कॉमेडी सेंट्रल, व्हायाकॉम 18, व्हीएच 1 आणि विझक्राफ्ट इंडियाने वॅक्स लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले आहे, याचा उद्देश कोरोना विषाणूशी
लढण्यासाठी जगाने एकत्र यावे, हा आहे.

या लाइव्ह इव्हेंटमध्ये सेलेना गोमेझ, प्रिन्स हॅरी आणि मेगन मॉर्केल, जेनिफर लोपेझ, बेन एफलेक हे सेलेब्स सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम 9 मे रोजी रात्री 8 ते 9 या वेळेत झाला तर त्याचे पुन्हा प्रसारण 10 आणि 11 मे रोजी होईल.

स्वतः 2 कोटींची केली मदत
दरम्यान, अमिताभ यांनी दिल्लीतील कोविड सेंटरसाठी 2 कोटी रुपयांची मदत केली आहे. दिल्लीच्या शीख गुरुद्वारा मॅनजमेंट कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी याबाबत माहिती दिली आहे.
त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले, ‘अमिताभ बच्चन यांनी श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर फॅसिलिटीसाठी 2 कोटी रुपयांची मदत केली आहे. अमिताभ हे मला रोज फोन करुन विचारणा करत
असतात’ असे म्हटले आहे.

त्यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली. ‘तुम्ही पैशाची चिंता करू नका… जास्तीत जास्त लोकांचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न करा! असे ते मला नेहमी सांगतात. त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...