आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभ यांचा मोठा निर्णय:बिग बी करणार अवयवदान; ट्विटरवर हिरव्या रंगाची फित लावलेला फोटो शेअर करुन म्हणाले - ‘मी अवयदान करण्याचा निर्णय घेतला आहे’

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभ बच्चन स्थलांतरीत मजुरांच्या मदतीसाठी पुढे आले होते.
  • पुलवामा हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांच्या कुटूंबियांना त्यांनी अडीच कोटी रुपये दिले होते.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मंगळवारी उशीरा रात्री त्यांनी आपला हा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितला आहे. बिग बींनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हिरवी फित लावलेला एक फोटोदेखील यासह शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "मी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.... याचे पावित्र्य दर्शवण्यासाठी ही हिरवी फित लावली आहे."

  • दररोज 15 तास काम करत आहेत

अमिताभ यांनी बुधवारी सकाळी एका ट्विटमध्ये सांगितले की, ते पेंगोलिन मास्क घालून कामावर जात असून दररोज 15 तास काम करतात. या ट्विटसह त्यांनी स्वत:चा एक फोटोही शेअर केला आहे. अमिताभ सध्या केबीसीच्या नव्या सीझनमध्ये दिसत आहेत.

  • सोशल मीडियावर होत आहे बिग बींचे कौतुक

अमिताभ यांच्या अवयवदान करण्याच्या निर्णयाचे सोशल मीडिया यूजर्सनी कौतुक केले आहे. अनेकांनी आपली प्रमाणपत्रे शेअर करुन अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली असल्याचे त्यांना सांगितले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser