आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ अपडेट:शस्त्रक्रियेनंतर अमिताभ यांनी चाहत्यांचे मानले आभार, म्हणाले - 'या पोस्टमध्ये काही चुका असू शकतात, त्याबद्दल मला समजून घ्या'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बींच्या दुस-या डोळ्यावरही लवकरच होणार शस्त्रक्रिया

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. सोमवारी सकाळी अमिताभ यांनी एक लांबलचक पोस्ट शेअर करत आपल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. यात त्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असलेल्या चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. आपल्या ब्लॉगमध्ये बिग बींनी लिहिले, 'तुमच्या शुभेच्छांबद्दल आणि काळजीबद्दल धन्यवाद. या वयात डोळ्याची शस्त्रक्रिया करणे खूप नाजूक आणि कौशल्याचे काम असते. या बाबतीत सर्वोत्तम उपचार मला मिळालेले आहेत आणि सगळं व्यवस्थित असल्याची मी आशा करतो. माजी दृष्टी आणि बरे होण्याचा वेग जरा कमी आहे, त्यामुळे या पोस्टमध्ये काही चुका असू शकतात. त्याबद्दल मला समजून घ्या,' असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

बिग बींच्या दुस-या डोळ्यावरही लवकरच होणार शस्त्रक्रिया
बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये त्यांच्यावर अजून एक शस्त्रक्रिया लवकरच होणार असल्याची माहिती दिली आहे. 'बरे होण्याचा वेग कमी आहे. आणि दुस-या डोळ्याचीही शस्त्रक्रिया होणे बाकी आहे. जर सगळं व्यवस्थित पार पडलं तर विकास बहलसोबत मी माझ्या नवीन चित्रपटासाठी लवकरच काम सुरु करू शकेन, ज्याचे नाव सध्या तरी गुड बाय असे आहे,' असे बिग बींनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी या चित्रपटाच्या लूक टेस्टचे फोटो शेअर करुन ही फक्त लूक टेस्ट आहे, अद्याप काहीही फायनल झालेले नाही, असे सांगितले होते.

शनिवारी ब्लॉगमध्ये दिली होती शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती
'बिग बींना मोतीबिंदू झाला होता. तो काढण्यासाठी छोटीशी लेजर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 24 तासांसाठी त्यांना डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आले होते आणि आज ते घरी परतणार आहेत,' अशी माहिती त्यांच्या एका जवळच्या मित्राने दिली होती. तर अमिताभ यांनीही शनिवारी रात्री प्रकृती बिघडल्याची माहिती ब्लॉगच्या माध्यमातून दिली होती. 78 वर्षीय बिग बींनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये एका ओळीत लिहिले होते, ‘मेडिकल कंडिशन, सर्जरी… यापेक्षा जास्त काही लिहू शकत नाही.’

बिग बींचे आगामी प्रोजेक्ट्स
अमिताभ बच्चन सध्या अजय देवगण दिग्दर्शित 'मे डे' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी होते. या चित्रपटात त्यांच्यासह अजय देवगण, रकूल प्रीत सिंग आणि बोमन इराणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय त्यांच्या आगामी 'झुंड' या चित्रपटाची रिलीज डेटही निश्चित झाली आहे. हा चित्रपट येत्या 18 जूनला रिलीज होणार आहे. याशिवाय 'ब्रह्मास्त्र', 'चेहरे' आणि 'बटरफ्लाय' हे त्यांचे आणखी काही आगामी चित्रपट आहेत.

बातम्या आणखी आहेत...