आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, ते एक अनरोमँटिक व्यक्ती आहेत, ज्याला जया बच्चन यांनीही सहमती दर्शवली होती. मात्र, अमिताभ कायमच अनरोमँटिक नव्हते. अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, लग्नाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी पत्नी जयासाठी करवा चौथचा उपवास ठेवला होता.
बिग बींनी दिला आठवणींना उजाळा
नुकताच केबीसीच्या नव्या भागाचा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या भागात गुरुग्राममध्ये राहणा-या रुची अमिताभ यांच्यासमोर हॉट सीटवर बसल्या होत्या. यावेळी बिग बींशी संवाद साधताना रुची यांनी सांगितले की, त्या आणि त्यांचे पती एकमेकांसाठी करवाचौथचा उपवास ठेवतात. ज्यावर बिग बी म्हणाले - सुरुवातीला मीदेखील पत्नीसाठी उपवास करायचो, पण नंतर सोडून दिले.
जया यांच्यासोबत लग्नासाठी अमिताभ यांनी ठेवली होती एक अट
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 2023 मध्ये 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. काही दिवसांपूर्वी जया त्यांची नात नव्या नवेली नंदाच्या व्हॉट द हेल नव्या या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितले की, "खरंतर 1973 च्या ऑक्टोबर महिन्यात आमचे लग्नं ठरले होतं, पण चार महिने आधीच माझे आणि अमिताभ यांचे लग्न झाले. जंजीर सिनेमाच्या सेलिब्रेशनसाठी परदेशात एकत्र जाण्याची परवागनी बच्चन कुटुंबाने न दिल्याने लग्नाशिवाय पर्याय नव्हता.'
जेव्हा नात नव्याने जया यांना त्यांच्या लव्हस्टोरीविषयी विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, 'मुळात अमिताभ यांना माझ्यासारखी बायको नकोच होती. म्हणजे, लग्नानंतर रोज कामासाठी दिवसभर बाहेर जाणारी बायको त्यांना नको होती. मी तेव्हा काम करत होते, माझ्या हातात चित्रपट होते पण अमिताभ यांची अट मी मान्य केली आणि काम थांबवले.'
अमिताभ यांनी सांगितली बच्चन आडनावामागील कहाणी
केबीसीच्या नवीन भागात बिग बींनी आपल्या बच्चन आडनावामागील कहाणी सांगितले. अमिताभ म्हणाले, 'माझ्या वडिलांना जातीच्या बंधनामध्ये अडकायचे नव्हते. ते कविता करताना बच्चन या नावाचा वापर करायचे. मला शाळेमध्ये दाखल करताना शिक्षकांनी माझ्या वडिलांना आमचे आडनाव विचारले. त्याच क्षणी त्यांनी माझे आडनाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षकांना ‘बच्चन’ असे लिहा हे सांगितले. तेव्हा मी पहिला बच्चन झालो,' असे अमिताभ यांनी सांगितले.
अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, बिग बी अलीकडेच विकास बहल दिग्दर्शित 'गुडबाय' चित्रपटात दिसले होते. याशिवाय त्यांचा आगामी 'ऊंचाई' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय अनुपम खेर, बोमन इराणी, डॅनी आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.