आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रुग्णालयातील अमिताभ यांचा 11 वा दिवस:बिग बींनी मानले चाहत्यांचे आभार; म्हणाले - 'तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना आणि काळजी करत आहात आणि मी फक्त हात जोडतोय' 

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11 जुलैपासून अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक रुग्णालयात दाखल आहेत.
  • 17 जुलैला प्रकृती बिघडल्यानंतर ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील नानावटी हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डात अमिताभ बच्चन यांचा आज (मंगळवार) 11 वा दिवस आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याकाळातही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. सोमवारी रात्री त्यांनी चाहत्यांसाठी एक ब्लॉग लिहिला. ज्यामध्ये ते म्हणाले की तुम्ही सर्वजण माझ्यासाठी सतत प्रार्थना आणि काळजी करत आहात आणि मी फक्त हात जोडतोय. 

ब्लॉगच्या सुरूवातीस, बिग बींनी  नेहमीप्रमाणे त्यांच्या काही चाहत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, "माझे प्रेम आणि शुभेच्छा तुमच्यासोबत नेहमीच असतील." 

  • ट्विटरच्या माध्यमातूनही मानले आभार

बिग बींनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातूनही चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'या कठीण प्रसंगात तुम्ही माझ्यावर करत असलेले प्रेम आणि माझ्यासाठी करत असलेली काळजी या सगळ्यातच माझा दिवस जात आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून शक्य होईल तसे सगळ्यांच्याच शुभेच्छा स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद', असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.