आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांचे दिल्लीतील घर 'सोपान' विकले आहे. दक्षिण दिल्लीतील गुलमोहर पार्कमध्ये त्यांचे हे घर होते. रिपोर्ट्सनुसार, अमिताभ यांनी त्यांचे घर 23 कोटींना विकले आहे. या घरात अमिताभ यांचे दिवंगत आई-वडील हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन राहत होते.
रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांचे हे घर नीझॉन ग्रुप ऑफ कंपनीजच्या सीईओ अवनी बदेर यांनी विकत घेतले आहे. अवनी बच्चन कुटुंबाला 35 वर्षांपासून ओळखतात. त्या त्यांच्या घराजवळच राहतात. अमिताभ यांच्या 418.05 स्क्वेअर मीटरच्या घराची रजिस्ट्री 7 डिसेंबर 2021 रोजी अवनी यांच्या नावावर करण्यात आली होती.
मुंबईत शिफ्ट होण्यापूर्वी बिग बी या घरात आई-वडिलांसोबत राहत होते
मुंबईत शिफ्ट होण्यापूर्वी बिग बी आपल्या आई-वडिलांसोबत या घरात राहत होते. या घरात त्यांच्या आई-वडिलांसोबतच्या अनेक आठवणी आहेत. असं म्हटलं जातं की बच्चन कुटुंबाचं हे पहिलं घर होतं. हरिवंशराय बच्चन 1980 पर्यंत 'सोपान'मध्ये त्यांचे काव्य सत्र आयोजित करायचे. हा बंगला अमिताभ यांची आई तेजी बच्चन यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
बाजारभावानेच घराचा व्यवहार झाला आहे.
अवनी बदेर म्हणाल्या, “हे जुने बांधकाम आहे, त्यामुळे आम्ही ते पाडून आमच्या गरजेनुसार ते पुन्हा बांधू. आम्ही या भागात अनेक वर्षांपासून राहत आहोत आणि प्रॉपर्टीच्या शोधातही होतो. तेव्हा या घरासाठी ऑफर आली. म्हणून आम्ही लगेच हो म्हटलं आणि मालमत्ता विकत घेतली.'
दक्षिण दिल्लीतील रिअल इस्टेट एजंट प्रदीप प्रजापती म्हणाले, "तेजी बच्चन, ज्या एक फ्रीलान्स जर्नलिस्ट होत्या, ती गुलमोहर पार्क हाऊसिंग सोसायटीच्या सदस्या देखील होत्या. अमिताभ मुंबईत येण्यापूर्वी येथे राहत होते आणि नंतर त्यांचे पालकही येथून गेले. वर्षानुवर्षे या घरात कोणीच राहत नाही. या घराचा सौदा बाजारभावानेच झाला आहे."
अमिताभ यांच्या मुंबईत अनेक मालमत्ता आहेत
गेल्या वर्षी, अमिताभ यांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला रोडवरील अटलांटिस बिल्डिंगमध्ये 31 कोटी रुपयांचे डुप्लेक्स खरेदी केले होते, जे 5,184 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. 27 व्या आणि 28 व्या मजल्यावर असलेल्या या डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये बिग बींना 6 कार पार्किंग देखील आहे. अमिताभ बच्चन यांचे मुंबईत आधीच 5 बंगले आहेत. 10 हजार स्क्वेअर फूटमध्ये असलेल्या 'जलसा'मध्ये ते कुटुंबासह राहतात.
दुसरा बंगला 'प्रतीक्षा' आहे, जिथे ते 'जलसा'ला शिफ्ट होण्यापूर्वी राहत होते. अनेक वर्षांपासून अमिताभ आपल्या आई-वडिलांसोबत येथे राहत होते. अभिषेक आणि श्वेताचे बालपणही इथेच गेले. तिसरा बंगला 'जनक' आहे, जिथे त्यांचे ऑफिस आहे. तर चौथा बंगला 'वत्स' आहे. वृत्तानुसार, त्यांनी ते एका बँकेला भाडेतत्त्वावर दिले आहे. या सगळ्याशिवाय 2013 मध्येही त्यांनी 'जलसा'च्या मागे 8000 स्क्वेअर फूट असलेला एक बंगला सुमारे 60 कोटी रुपयांना विकत घेतला होता, ज्याचे नाव त्यांनी 'अम्मू' ठेवले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.