आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींची कायदेशीर कारवाई:अमिताभ बच्चन यांनी पान मसाला कंपनीला पाठवली नोटीस, करार संपल्यानंतरही दाखवली जातेय जाहिरात

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच एका पान मसाला कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून त्यांची जाहिरात प्रसारित करण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता या कंपनीच्या जाहिरातींमध्ये दिसत होता, तरीही त्यांनी त्यांच्या शेवटच्या वाढदिवशी या कंपनीसोबतचा करार संपवला होता. करार संपला असतानाही कंपनीकडून सातत्याने जाहिरात प्रसारित केली जात आहेत.

अलीकडेच ई-टाइम्सने त्यांच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे की, अमिताभ बच्चन यांच्या कार्यालयातून कळले आहे की त्यांनी कमला पासंद कंपनीला त्यांच्या टीव्ही व्यावसायिक जाहिरातीचे प्रसारण थांबवण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. एंडोर्समेंट कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतरही कमला पसंद त्याकडे दुर्लक्ष करून टीव्ही जाहिरातींचे प्रसारण करत असल्याचे दिसून आले आहे.

अमिताभ बच्चन यांना पान मसालाच्या जाहिरातीत दिसल्यामुळे त्यांना बराच काळ ट्रोल करण्यात येत होते, त्यानंतर त्यांनी 11 ऑक्टोबर रोजी त्यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त पान मसाला कंपनीसोबतचा करार संपवण्याची घोषणा केली होती. करार संपवण्यासोबतच बिग बींनी कंपनीला त्याचे पैसेही परत केले होते. करारावर स्वाक्षरी करताना बिग बींना ही सरोगेट जाहिरात असल्याची कल्पना नव्हती असे सांगण्यात येत आहे.

सरोगेट जाहिरात म्हणजे काय?
तुम्ही अनेकदा टीव्हीवर कोणत्याही अल्कोहोल, तंबाखू किंवा तत्सम उत्पादनाच्या जाहिराती पाहिल्या असतील, ज्यामध्ये उत्पादनाचे थेट वर्णन न करता, ते दुसरे समान उत्पादन किंवा पूर्णपणे भिन्न उत्पादन म्हणून दाखवले जाते. उदाहरणार्थ, अल्कोहोल बहुतेकदा संगीत सीडी किंवा सोडाच्या स्वरूपात दर्शविले जाते.

राष्ट्रीय तंबाखू विरोधी संघटनेने केला होता हस्तक्षेप
या जाहिरातीमुळे अमिताभ वादात सापडले होते. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पान मसालाचे प्रमोशन करताना पाहून चाहते संतापले होते. राष्ट्रीय तंबाखू विरोधी संघटनेने (एनजीओ)ही या प्रकरणात हस्तक्षेप केला. एनजीओने बिग बी यांना अधिकृत पत्र पाठवले आहे, ज्यामध्ये त्यांना ही जाहिरात मोहीम लवकरात लवकर सोडण्याची विनंती करण्यात आली आहे.

बिग बींना प्रचंड ट्रोल होत होते
या जाहिरातीत दिसल्यानंतर बिग बींना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात होते. अशाच एका युजरला उत्तर देताना अभिनेत्याने लिहिले की, 'मान्यवर, मी माफी मागतो, जर कोणी कोणत्याही व्यवसायात चांगले काम करत असेल तर आपण त्याच्याशी का संबंध ठेवतो आहोत, असा विचार करू नये. होय, व्यवसाय असेल तर आपल्या व्यवसायाचाही विचार करावा लागतो. आता तुम्हाला असे वाटते की मी हे करू नये. पण हो, मला हे करण्यासाठी मोबदलाही मिळतो. आमच्या उद्योगात काम करणाऱ्या, नोकरदार असलेल्या अनेकांना रोजगार आणि पैसाही मिळतो. मी तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार करतो.

बातम्या आणखी आहेत...