आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावूक झाले अमिताभ बच्चन:पोलंडने केला हरिवंश राय बच्चन यांचा सन्मान, देशातील 'या' महत्त्वाच्या रस्त्याला दिले नाव, भावूक झालेले बिग बी म्हणाले...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलंडमध्ये यापूर्वीही मिळाला आहे दिवंगत हरिवंश राय बच्चन यांना सन्मान

बॉलिवूडचे महानायक अर्थातच अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. नुकतीच त्यांनी एक आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. नुकतीच त्यांनी एक पोस्ट करत, पोलंड देशातील एका चौकाला वडील हरिवंश राय बच्चन यांचे नाव दिले जाणार असल्याचे सांगितले आहे.

बिग बींनी भावूक होऊन लिहिले, ‘पोलंडमधील व्रोक्लाव शहरातील एका चौकाचे नामकरण करण्यात येणार असून, बाबूजींचे नाव त्याला दिले जाणार आहे. दस-याच्या निमित्ताने यापेक्षा दुसरी मोठी भेट असूच शकत नाही. कुटुंब, व्रोक्लाव येथील भारतीय समुदाय आणि भारतासाठी हा अभिमानाचा क्षण. जय हिंद’, असे त्यांनी लिहिले आहे.

बिग बींनी ट्विटरवरही ही माहिती शेअर केली आहे. ”प्रबिसि नगर कीजे सब काजा. हृदयं राखि कोसलपुर राजा’... रामचरितमानस , सुंदर कांड. भावार्थ – अयोध्यापुरीचे राजा श्री रघुनाथजी यांना हृदयात ठेवून नगरात प्रवेश करा. तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होतील.” अशा आशयाचे ट्विट करुन अमिताभ बच्चन यांनी या सन्मानासाठी पोलंड सरकारचे आभार मानले आहेत.

पोलंडमध्ये यापूर्वीही मिळाला आहे दिवंगत बच्चन यांना सन्मान
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात पोलंडच्या एका चर्चमध्ये डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली होती. बिग बी येथील लोकांचे प्रेम बघून अतिशय भावूक झाले होते. त्यांनी प्रार्थनेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

बिग बींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, 'यूरोपमधील सर्वात जुन्या चर्चपैकी एक. पोलंडमध्ये बाबूजींसाठी प्रार्थना झाली. मनाला स्पर्श करणारा क्षण. त्यांच्या आत्म्याला नक्कीच शांती आणि प्रेम मिळेल. या सन्मानासाठी सर्वांचे धन्यवाद', असे ते म्हणाले होते.