आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर वादाच्या भोव-यात अडकलेली रिया चक्रवर्तीला खासगी आयुष्यासोबतच प्रोफेशनल लाइफमध्येही जनतेच्या नाराजीचा फटका सहन करावा लागतोय. एकीकडे तिला चित्रपट मिळत नाहीये, तर दुसरीकडे जे चित्रपट तिच्या हातात आहे, त्यातही तिच्या सीनवर कात्री फिरताना दिसत आहे. ताजे उदाहरण म्हणजे आगामी चित्रपट 'चेहरे'. प्रेक्षकांची नाराजी सहन करावी लागू नये, म्हणून निर्मात्यांनी चेहरे या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरवर रियाचा चेहरा वापरला नव्हता. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टरदेखील रिलीज करण्यात आले आहे. मात्र या पोस्टरवरही रिया चक्रवर्ती झळकलेली नाही.
उद्या रिलीज होतोय टीझर
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचे दुसरे पोस्टर शेअर करत याचा टीझर उद्या म्हणजे 11 मार्च रोजी रिलीज होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. सोबतच चित्रपटाची प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर केली आहे. पोस्टर शेअर करताना बिग बी लिहितात, "चंद चेहरे, हजारों राज। हर चेहरा कुछ कहता है और बहुत कुछ छुपाता है।...' 30 एप्रिल 20221 रोजी त्यांच्या ख-या चेह-यांवरुन पडदा उचलला जाईल, असेही त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या पोस्टरवर बिग बींसह इमरान हाश्मी दिसतोय. मात्र रिया यावर झळकलेली नाही.
रियाला चित्रपटातून वगळण्यात आले का?
आतापर्यंत चेहरे या चित्रपटाचे दोन पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. या दोन्हीवर रिया दिसलेली नाही. त्यामुळे चित्रपटातून तिला वगळण्यात आले की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जाऊ लागू नये, म्हणून निर्मात्यांनी रियाला चित्रपटातून ड्रॉप केले, असेही म्हटले जात आहे.
यापूर्वी पोस्टरवर दिसले चित्रपटातील सर्व कलाकारांचे चेहरे
'चेहरे' या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते, ज्यात अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी, अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा आणि बंगाली चित्रपट अभिनेता धृतिमान चटर्जी झळकले होते. पण पोस्टरवरून रिया चक्रवर्तीचा चेहरा गायब होता.
2019 मध्ये रियाने रूमी जाफरी दिग्दर्शित चित्रपटासाठी शूटिंग केले होते आणि त्यावेळी तिने फर्स्ट लूकदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता.
रुमी जाफरी दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्यासह अन्नू कपूर, रघुवीर यादव, सिद्धांत कपूर आणि क्रिस्टल डिसुजा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.