आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवाला नमस्कार:अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयातून शेअर केला विठ्ठल-रुख्माईचा फोटो, म्हणाले - 'ईश्वराच्या चरणात समर्पित' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल झालेल्या अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी दुपारी विठ्ठल आणि रुख्माईचा यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, 'देवाच्या चरणी समर्पित'. गेल्या दीड महिन्यादरम्यान अमिताभ यांनी या मंदिराचा फोटो सहा वेळा शेअर केले आहे.   शनिवारी अमिताभ आणि त्यांचा मुलगा अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यानंतर ते सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे आणि त्याच्या चाहत्यांच्या कॉन्टॅकमध्ये  आहेत. त्यांनी बुधवार-गुरुवारच्या दरम्यान रात्री विदूर नितीचे श्लोक शेअर केले आणि नेहमी दुःखी असलेल्या 6 लोकांबद्दल सांगितले.

रुग्णालयातही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत बिग बी 
अमिताभ यांनी ब्लॉगसोबतच ट्विटर आणि इंस्टाग्रामवर लिहिले होते की.... 'ईर्ष्यी घृणी त्वसंतुष्ट: क्रोधनो नित्यशड्कितः। परभाग्योपजीवी च षडेते दुखभागिनः।। म्हणजेच सर्वाची ईर्ष्या, घृणा करणारे, असंतोषी, क्रोधी, नेहमी संशय घेणारे आहे इतरांच्या आधारे जगणारे सहा प्रकारचे लोक नेहमी दुःखी असतात. अशा लोकांपासून दूर राहायला हवे. 

बातम्या आणखी आहेत...