आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महानायक हेल्थ अपडेट:अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर; आज मिळणार हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. बिग बी यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना सोमवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. शनिवारी बिग बींनी याबाबतची माहिती दिली होती. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.

बिग बींना मोतीबिंदू झाला होता. तो काढण्यासाठी छोटीशी लेजर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 24 तासांसाठी त्यांना डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आले होते आणि आज ते घरी परतणार आहेत, अशी माहिती त्यांच्या एका जवळच्या मित्राने दिली होती.

बिग बींनी ब्लॉगवरुन दिले होते हेल्थ अपडेट
बिग बी सोशल मीडियावर सतत अॅक्टिव असतात. त्यांनी शनिवारी रात्री प्रकृती बिघडल्याची माहिती ब्लॉगच्या माध्यमातून दिली होती. 78 वर्षीय बिग बींनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये एका ओळीत लिहिले होते, ‘मेडिकल कंडिशन, सर्जरी… यापेक्षा जास्त काही लिहू शकत नाही.’

चाहत्यांनी केली प्रकृतीसाठी प्रार्थना
ब्लॉगवर कमेंट करताना लोकांनी अमिताभ यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. एका यूजरने लिहिले, 'सर, स्वतःची काळजी घ्या, लवकर बरे व्हा.' आणि एका यूजरने लिहिले, 'तुमच्या प्रकृतीसाठी आम्ही सर्वजण प्रार्थना करतोय.' बिग बींनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. त्यात त्यांनी प्रश्नार्थक चिन्हं वापरली होती.

त्याच दिवशीची बिग बींची आणखी एक पोस्ट -

मागील वर्षी झाली होती कोरोनाची लागण
गेल्यावर्षी बिग बी यांच्यासह त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याकाळात बिग बी ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना सतत हेल्थ अपडेट देत होते. 22 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर बिग बी बरे होऊन घरी परतले होते. तर अभिषेकला 28 दिवस रुग्णालयात राहावे लागले होते. ऐश्वर्या आणि आराध्याला 10 दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

बिग बींचे आगामी प्रोजेक्ट्स
अमिताभ बच्चन सध्या अजय देवगण दिग्दर्शित 'मे डे' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी होते. या चित्रपटात त्यांच्यासह अजय देवगण, रकूल प्रीत सिंग आणि बोमन इराणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय त्यांच्या आगामी 'झुंड' या चित्रपटाची रिलीज डेटही निश्चित झाली आहे. हा चित्रपट येत्या 18 जूनला रिलीज होणार आहे. याशिवाय 'ब्रह्मास्त्र', 'चेहरे' आणि 'बटरफ्लाय' हे त्यांचे आणखी काही आगामी चित्रपट आहेत.

बातम्या आणखी आहेत...