आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अ‍ॅनिव्हर्सरी:लग्नाला 47 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमिताभ यांनी सांगितले कोणत्या परिस्थितीत झाले होते लग्न, म्हणाले - आम्ही लंडनला जाणार होतो, पण... 

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बी म्हणाले - मी वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं.
Advertisement
Advertisement

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा आज (3 जून) वाढदिवस असून त्यांच्या लग्नाला 47 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने बिग बींनी सोशल मीडियावर  एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी आपल्या लग्नाचा किस्सा शेअर केला आहे. वडिलांच्या आज्ञेचं पालन करुन लग्न केल्याचे  त्यांनी सांगितले आहे. सोबतच त्यांनी 'जंजीर' या चित्रपटाच्या यशाशी संबंधित किस्सा सांगितला आहे. सोबतच आपल्या लग्नाच्या फोटोंचा कोलाजही शेअर केला आहे.

अमिताभ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'आज 3 जून 1973 ला 47 वर्षे पूर्ण झाली. जर 'जंजीर' हिट झाला तर आम्ही काही मित्र पहिल्यांदा लंडनला जाऊ असे आम्ही ठरवले होते.  मग माझ्या वडिलांनी विचारले की, तू कोणाबरोबर जात आहेस? मी कोणाबरोबर जात आहे हे जेव्हा मी त्यांना सांगितले, तेव्हा ते म्हणाले - तुला जायचे असेल तर तुला हिच्याबरोबर आधी लग्न करावे लागेल, नाहीतर तू जाऊ नकोस... म्हणून... मी त्या आज्ञेचं पालन केलं.'

  • बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर कमेंट करताना बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. बिपाशा बसूने लिहिले, 'माझे आवडते कपल. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.' भूमी पेडणेकरने लिहिले, 'हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी. एकत्र राहण्यासाठी अनेक वर्षांबद्दल शुभेच्छा.' याशिवाय राजकुमार राव, मनीष पॉल, मृणाल ठाकूर, शमिता शेट्टी, अहाना कुमार आणि ईशा देओल यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

  • अभिषेकनेही आईवडिलांना दिल्या शुभेच्छा

अभिषेक बच्चनने आपल्या आईवडिलांचा एक फोटो शेअर करुन त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेकने लिहिले,  'हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी मा अँड पा.. लव्ह यू.' 

View this post on Instagram

Happy Anniversary Ma and Pa. Love you.

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on Jun 2, 2020 at 10:19pm PDT

  • 'जंजीर' अमिताभ यांचा पहिला सोलो हिट

 11 मे 1973 रोजी रिलीज झालेला 'जंजीर' हा अमिताभ बच्चन यांचा पहिला सोलो हिट चित्रपट होता. सिनेसृष्टीतील चार वर्षांच्या संघर्षानंतर बिग बींना या चित्रपटामुळे यशाची चव चाखता आली होती. या चित्रपटापूर्वी त्यांनी 12 चित्रपटांमध्ये काम केले होतो. पण त्यापैकी फक्त दोन चित्रपट (लीड अभिनेता म्हणून बॉम्बे टू गोवा आणि सहायक अभिनेता म्हणून आनंद) हिट झाले होते. पण जंजीरसुद्धा त्यांना अनेक संघर्षानंतर मिळाला होता. 

  • नशिबाने मिळाला होता अमिताभ यांना 'जंजीर'

अमिताभ बच्चन यांच्या आधी 'जंजीर' या चित्रपटासाठी धर्मेंद्र, देव आनंद आणि राजकुमार यांना विचारणा झाली होती. पण हे कदाचित अमिताभ यांचे नशीब असेल की, या तिघांपैकी कुणासोबतही चित्रपट फ्लोअरवर येऊ शकला नाही. प्रकाश मेहरा यांनी एका मुलाखतीत या मागची कहाणी सांगितली होती. हा चित्रपट मुळात त्यांचा चित्रपट नव्हता. धर्मेंद्र यांनी सलीम-जावेद यांच्याकडून  कहाणीचे हक्क खरेदी केले होते. त्यावेळी मेहरा 'समाधी' या नावाने एक चित्रपट बनवण्याचा विचार करत होते.  धर्मेंद्र यांना जेव्हा समाधी या चित्रपटाविषयी कळले तेव्हा त्यांना तो चित्रपट इतका भावला की, त्यांनी 'समाधी'च्या मोबदल्यात मेहरा यांना 'जंजीर' दिला.

Advertisement
0