आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॅक टू वर्क:पत्नी जया आणि मुलगी श्वेतासोबत अमिताभ बच्चन यांनी केले जाहिरातीचे चित्रीकरण, फॅमिली फोटो शेअर करुन लिहिले - 'फॅमिली अ‍ॅट वर्क'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकउननंतर जया आणि श्वेता यांनी पहिल्यांदाच शूटिंग केले आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या आपल्या कामात बिझी आहेत. ‘कौन बनेगा करोडपती 12’ या रिअ‍ॅलिटी शो व्यतिरिक्त बिग बींनी नुकतेच एका नवीन जाहिरातीचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या जाहिरातीत त्यांच्यासोबत पत्नी जया बच्चन आणि मुलगी श्वेता नंदा देखील दिसणार आहेत.

कुटुंबासमवेत चित्रीकरण करताना अमिताभ बच्चन यांनीही फॅमिली टाइमचा आनंद घेतला आहे. बिग बींनी जाहिरातीच्या सेटवरुन एक फॅमिली फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी स्वतः हा सेल्फी क्लिक केला आहे. यात त्यांची मुलगी श्वेता नंदा मास्क सांभाळत मोबाइल पकडताना दिसत आहे. तर जया बच्चन कँडिड कॅप्चर झाल्या आहेत. हा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर कॅप्शनमध्ये लिहिले, ‘फॅमिली अ‍ॅट वर्क’. चित्रीकरणादरम्यान बच्चन कुटुंब एथनिक वेअरमध्ये दिसत आहे. बिग बींनी पिवळ्या रंगाचा कुर्ता, मण्यांची माळ आणि एक पांढरी पगडी परिधान केलेली आहे. तर, जया बच्चन यांनी गुलाबी रंगाच्या साडीसह हेवी ज्वेलरी घातली आहे. तर श्वेता पांढ-या रंगाच्या साडीत दिसतेय.

शूटमधील दुसर्‍या दृश्यामध्ये बिग बींनी खादीचा कोट आणि पांढरा कुर्ता पायजामासह, पांढरी टोपी घातली आहे. तर जया बच्चन यांनी बनारसी साडी आणि गळ्यात सुंदर चोकर परिधान केला आहे. श्वेता बच्चन हलक्या पिवळ्या रंगाचा सूट आणि डायमंड ज्वेलरीमध्ये दिसली आहे. हा फोटो अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

यापूर्वीही बिग बी आणि जया बच्चन अनेक ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातींमध्ये एकत्र दिसले होते. याशिवाय एका ब्रँड शूटमध्ये अमिताभ आणि जया यांनी कतरिना कैफच्या पालकांची भूमिका निभावली होती. जया बच्चन वगळता बिग बींच्या संपूर्ण कुटुंबाला जुलैमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाली होती. कोरोनावर यशस्वी मात करत, बिग बींनी ‘केबीसी 12’चे चित्रीकरण सुरू केले. लॉकउननंतर जया आणि श्वेता यांनी पहिल्यांदाच शूटिंग केले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser