आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन शुभेच्छा:अमिताभ बच्चनपासून ते कार्तिक आर्यनपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी दिल्या ईदच्या शुभेच्छा,  सोनाक्षी म्हणाली - प्रार्थनांमध्ये लक्षात ठेवा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूड कलाकार म्हणाले - ईद मुबारक...

ईद-उल-फितरचा सण आज (25 मे) देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने बॉलिवूड स्टार्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह कार्तिक आर्यन, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, सारा अली खान, अनन्या पांडे आणि सोनाली सहगलसह अनेक स्टार्सनी शुभेच्छांचे मेसेज शेअर केले.   अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनंदन संदेशात लिहिले की, 'सर्वांना ईद मुबारक आणि या मंगलदिनी शांतता, सौहार्द, चांगले आरोग्य, मैत्री आणि प्रेमासाठी प्रार्थना... आपण शांती आणि प्रेमाने एकमेकांच्या जवळ येऊ या आणि बहीणभाऊ व कुटूंबाप्रमाणेच एकत्र राहू... एक व्हा... एक व्हा...'

  • सोनाक्षीने लिहिले- प्रार्थनांमध्ये लक्षात ठेवा

सोनाक्षी सिन्हाने शुभेच्छा देताना लिहिले की, 'ईद मुबारक! जगात पूर्वीपेक्षा जास्त प्रेम आणि करुणा आवश्यक आहे... त्या सर्वांसाठी प्रार्थना करा, ज्यांना त्याची गरज आहे. प्रार्थनांमध्ये लक्षात ठेवा.'

  • सोनमने प्रार्थना केल्याबद्दल आभार मानले

सोनमने लिहिले- 'माझ्या भावा-बहिणींना ईद मुबारक, आशा आहे की या वर्षाचे सर्व त्रास आणि अडचणी उत्तम उद्याचा पाया असेल. रमजानच्या या पवित्र महिन्यात आमच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद.'

  • अनन्याने खूप प्रेम पाठवलं

अनन्याने तिच्या अभिनंदन संदेशात 'ईद मुबारक' लिहिले. ती म्हणाली, 'खूप खूप प्रेम, सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि एक मोठा व्हर्च्युअल हग पाठवित आहे. # घरी रहा # सुरक्षित रहा.'

  • साराने प्रार्थना करतानाचा बालपणीचा फोटो शेअर केला.
  • कार्तिक आर्यनने ईद मुबारक सांगितले.

View this post on Instagram

Eid Mubarak ✨

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on May 24, 2020 at 10:14pm PDT

  • सोनाली सहगल म्हणाली, ईद मुबारक.
  • तारा सुतारियाने हे छायाचित्र शेअर करुन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

View this post on Instagram

Eid Mubarak! ✨

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on May 24, 2020 at 10:17am PDT

  • कियारा अडवाणीने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
बातम्या आणखी आहेत...