आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सूर्यवंशम'च्या पडद्यामागील गोष्टी:चित्रपटातील अमिताभ यांची हवेली ही गुजरातमधील पालनपूर येथील एक रिसॉर्ट, रेखाने दिला होता दोन अभिनेत्रींना आवाज

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 'सूर्यवंशम' हा चित्रपट टीव्हीवर वारंवार दाखवला जातो.

तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' हा चित्रपट 21 मे 1999 रोजी प्रदर्शित झाला होता. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन 22 वर्षे झाली आहेत. अमिताभ यांची दुहेरी भूमिका असलेल्या या चित्रपटावर आजही अनेक मीम्स बनतात. टीव्हीवर 'सूर्यवंशम' इतक्या वेळा दाखवला गेला आहे की, लोकांना आता चित्रपटातील संवादसुद्धा तोंडपाठ झाले आहेत. 'सूर्यवशंम'च्या रिलीजला 22 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्याच्यासंबंधीच्या या खास गोष्टी..

यामुळे कल्ट चित्रपटाचा मिळाला 'सूर्यवंशम'ला दर्जा

 • रेखाने या चित्रपटात अभिनेत्री जयासुधा आणि सौंदर्या या दोन अभिनेत्रींना आपला आवाज दिला आहे..
 • चित्रपटात रिअल लाइफ कपल राजेश खट्टर आणि नीलिमा अजीम यांनी पती पत्नीची भूमिका साकारली होती. आता राजेश खट्टर आणि नीलिमा यांचा घटस्फोट झाला आहे.
 • चित्रपट 21 मे 1999 ला प्रदर्शित झाला होता आणि याच वर्षी सेट मॅक्स वाहिनीसुद्धा सुरु झाली होती, याचा अर्थ दोन्ही एकाच वर्षी आले होते.
 • वाहिनीने या चित्रपटाचे 100 वर्षांसाठी हक्क खरेदी केले आहेत, त्यामुळे हा चित्रपट टीव्हीवर वारंवार दाखवला जातो. सेट मॅक्ससुद्धा आता सोनी मॅक्स चॅनेल झाले आहे.
 • सूर्यवंशम तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, यानंतर याच कहाणीवर 1997 ते 2000 या काळात 4 चित्रपट बनले आहेत.
 • पहिल्या वेळी 1997 मध्ये सरथ कुमार आणि देवयानीसोेबत बनला होता. त्यानंतर 1998 मध्ये तेलगूमध्ये डग्गूपती व्यंकटेश आणि मीना दुरईराज यांच्या सोबत बनला होता, तिस-या वेळी म्हणजे 1999 मध्ये अमिताभसोबत हिंदीमध्ये 'सूर्यवंशम' या टायटलने बनला. चौथ्यांदा हा चित्रपट 2000 मध्ये कन्नडमध्ये तयार झाला. त्याचे शीर्षक 'सूर्यवम्शा' हे होते. यात विष्णुवर्धन आणि ईशा कोप्पिकर मुख्य भूमिकेत होते.
 • त्याचे शूटिंग गुजरात, हैदराबाद आणि पोलोन्नारुवा, कँडी श्रीलंका येथे झाले होते. चित्रपटात दाखवलेली अमिताभची हवेली ही गुजरातमधील पालनपूर येथील एक रिसॉर्ट आहे. त्याचे नाव बलराम पॅलेस आहे, जे चितरासानी गावात बनले आहे.
 • हा चित्रपट बंगालमध्ये ब्लॉकबस्टर ठरला होता. कोलकाताच्या मेट्रो चित्रपटात या चित्रपटाने 100 दिवस पूर्ण केले होते.
 • हीरा ठाकूर यांची पत्नी सौंदर्याचे वयाच्या 31 व्या वर्षी निधन झाले. बंगळुरूमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान विमान अपघातात 2004 मध्ये तिचा मृत्यू झाला होता.
 • सौंदर्याने 1992 मध्ये 'गंधरवा' चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. तिने कन्नड, तेलगू, तामिळ आणि मल्याळमसह 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. सौंदर्याला 6 साऊथ फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाले. दक्षिणेत सक्रिय असलेल्या सौंदर्याचा 'सूर्यवंशम' हा बॉलिवूडचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला.
 • 'सूर्यवंशम'ची निर्मिती आदिशेषगिरी राव यांनी केली होती. चित्रपटाची कथा विक्रमनची होती, ते या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार होते, पण नंतर दिग्दर्शन ई.व्ही.व्ही. सत्यनारायण यांनी केले.
 • नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात बनलेल्या ‘सूर्यवंशम’ या चित्रपटाचे बजेट फक्त 7 कोटी रुपये होते, तर चित्रपटाची कमाई 12.65 कोटी होती.
 • स्लीपर हिट हा किताब मिळवलेल्या 'सूर्यवंशम'च्या एकूण कमाईविषयी बोलायचे झाले, तर सध्याच्या काळातील हा आकडा सुमारे 102 कोटी इतका आहे.
 • 'चोरी से चोरी से' या गाण्यांला अमिताभ बच्चन आणि सोनू निगम यांनी आवाज दिला. गाण्यातील नायकासाठी दोन गायकांचा आवाज वापरला गेला हे क्वचितच पाहिले गेले आहे.
 • राज किरण, शेफाली शाह आणि पूजा बत्रा यांनाही या चित्रपटासाठी भूमिकांची ऑफर देण्यात आली होती. पण तिघांनीही हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.
 • सुरुवातीला अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना वडील-मुलाची जोडी म्हणून दर्शविण्याची कल्पना होती, परंतु नंतर अमिताभ यांनी दुहेरी भूमिका साकारली.
 • भानुप्रताप यांचा नातू बाल अभिनेता आनंद वर्धन आहे, जो आता तेलगू चित्रपटाचा अभिनेता आहे आणि त्याने 20 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. आनंद हा गायक पीबी श्रीनिवास यांचा नातू आहे.
 • 1000 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे दाक्षिणात्य अभिनेते ब्रह्मानंदम यांनी सूर्यवंशममध्येही काम केले होते. चित्रपटात ते डॉक्टरच्या छोट्या भूमिकेत दिसले होते.
 • 'सूर्यवंशम'मध्ये टिळकधारी अमिताभ यांचा लूक इतका पसंत केला गेला की, नंतर तो मोहब्बतेंमध्ये आणि साऊथच्या सई रा नरसिम्हा रेड्डी या सिनेमात घेतला गेला.
 • 'सूर्यवंशम'पूर्वी अमिताभ, कादर खान आणि अनुपम खेर या तिघांनी 1998 साली आलेल्या 'बडे मियां छोटी मियां' या चित्रपटात काम केले होते.
बातम्या आणखी आहेत...