आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेगम' काळाच्या पडद्याआड:'गुलाबो सिताबो'मध्ये झळकलेल्या अभिनेत्री फारुख जाफर यांचे ब्रेन स्ट्रोकने निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी लखनऊच्या ऐशबाग येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमिताभ बच्चन यांच्या 'गुलाबो सिताबो' या चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्री फारुख जाफर यांचे शुक्रवारी वयाच्या 89 व्या वर्षी ब्रेन स्ट्रोकने निधन झाले. त्यांचे नातू शाज अहमद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. शाज अहमद यांच्यानुसार, शनिवारी लखनऊच्या ऐशबाग येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शाज अहमद यांनी पोस्ट शेअर करत लिहिले, "माझी आजी आणि स्वातंत्र्य सेनानी माजी एमएलसी एस एम जाफर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री फारुख जाफर यांचे आज सायंकाळी 7 वाजता लखनऊ येथे निधन झाले." फारुख यांची मोठी मुलगी मेहरु जाफर यांनी सांगितल्यानुसार, त्यांची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी होती आणि त्यांना या महिन्याच्या सुरुवातीला सहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

4 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
महरु जाफर म्हणाल्या, "आईला श्वास घेण्याच्या त्रासामुळे 4 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना बरे वाटत नव्हते. संध्याकाळी 7 च्या सुमारास त्यांचे निधन झाले."

'गुलाबो सिताबो'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसल्या होत्या फारुख
फारुख जाफर यांनी 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'गुलाबो सिताबो' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यांच्या पात्राचे नाव फातिमा बेगम होते. तर अमिताभ यांच्या पात्राचे नाव मिर्झा होते. या चित्रपटात आयुष्मान खुराणादेखील मुख्य भूमिकेत दिसला होता. फारुख जाफर यांनी शाहरुखच्या 'स्वदेश' आणि रेखाच्या 'उमराव जान'मध्ये महत्त्वाच्या भूमिका वठवल्या होत्या.

'गुलाबो सीताबो'च्या पटकथा लेखकाने व्यक्त केले दुःख
'गुलाबो सिताबो'च्या पटकथालेखक जुही चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर फारुख जाफर यांचा एक फोटो शेअर करत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, "बेगम गेल्या. तुमच्यासारखे कोणी नव्हते आणि कधीच नसेल. आम्हाला तुमच्याशी नाते जोडण्याची परवानगी दिल्याबद्दल तुमचे आभार. आता अल्लाहच्या जगात सुरक्षित रहा.'

बातम्या आणखी आहेत...