आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हात:स्थलांतरीत मजुरांच्या मदतीसाठी पुढे आले बिग बी, खाण्यापिण्यापासून ते वैद्यकिय सुविधा असलेल्या 10 बसेस मजुरांना घेऊन मुंबईहून रवाना

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता सोनू सूदच्या पावलांवर बिग बींचे पाऊल
  • परप्रांतीय मजुरांना मुंबईहून पाठवत आहेत त्यांच्या घरी

उत्तर प्रदेशमधील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडून बससेवा सुरू झाली आहे. त्यांनी हा उपक्रम महीम दर्गा ट्रस्ट आणि हाजी अली दर्गा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केला आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी हाजी अली दर्गा येथून 10 बस रवाना झाल्या. सर्व बसेसवर या दोन्ही ट्रस्टची नावे असलेले आणि अमिताभ यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले होते. यावर बिग बीचा संदेश आहे. 'तुम्ही सर्वजण तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचावेत हीच माझी इच्छा आहे', असे या बॅनरवर लिहिण्यात आले आहे.

बसमध्ये सुरक्षा आणि सोयीशीसंबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सामाजिक अंतर लक्षात घेऊन क्षमतेपेक्षा केवळ अर्धे मजुर बसवण्यात आले. 52 आसनांच्या बसमध्ये केवळ 25 मजूर बसवले गेले.

सर्वांना मास्क आणि सॅनिटायजर्स देण्यात आले. मेडिकल किटची सुविधा बसमध्येही उपलब्ध आहे. सर्व प्रवासी मजूर उत्तर प्रदेशातील लखनऊ, अलाहाबाद, गोरखपूर आणि भदोई या जिल्ह्यांतील आहेत.

  • अमिताभ यांचे मदतकार्य दोन महिन्यांपासून सुरू आहे

बातम्यांनुसार, अमिताभ बच्चन गेल्या दोन महिन्यांपासून मदतकार्यात व्यस्त आहेत. त्यांची कंपनी एबी कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव त्यांच्या वतीने गरजूंना मदत करत आहेत.

राजेश यादव हे हाजी अली ट्रस्ट आणि पीर मखदूम साहब ट्रस्ट यांच्या सहकार्याने हाजी अली दर्गा, अँटॉप हिल, बाबुलनाथ मंदिर, माहीम दर्गा, धारावी, सायन 90 फीट रोड, अरब गली, कोसला बंदर आणि वरळी लोटससह मुंबईतील विविध ठिकाणी दररोज 4500 हून अधिक फूड पॅकेट्स वितरित करत आहेत. 

  • हजारो कुटुंबांना रेशन दिले

बिग बींच्या कार्यालयाने एक हजार कुटूंबांसाठी 1000 रेशन पॅकेटसुद्धा उपलब्ध करुन दिले आहेत. हे रेशन  प्रत्येक गरजु कुटुंबाला एक महिना पुरेल इतके आहे. त्याशिवाय 9 मेपासून ते आणि त्यांची टीम मुंबईहून घरी पतरणा-या परप्रांतीय मजुरांना दररोज 2000 रेशन पाकिट, 2000 पाण्याच्या बाटल्या आणि सुमारे 1200 जोड्या स्लीपर प्रदान करत आहेत.

  • असंख्य मास्क आणि सॅनिटायझर्सचे वाटप देखील केले

अमिताभ यांच्या कार्यालयाने वेगवेगळ्या एजन्सी आणि स्थानिक अधिका-यांच्या सहकार्याने असंख्य मास्क, सॅनिटायझर्स वितरित केले आहेत. त्यांनी रुग्णालये, पोलिस ठाणे, बीएमसी कार्यालये आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणी 20,000 हून अधिक पीपीई किट दान केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...