आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभसाठी प्रार्थना:आरोग्य मंत्री म्हणाले - तुम्ही लाखो लोकांचे आदर्श, आम्ही तुमची चांगली काळजी घेऊ; पाकिस्तानातूनही केली जातीये दुआ

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडचे महानायक कोरोना पॉझिटिव्ह, स्वतः ट्विटरवर दिली माहिती

बॉलिवूडचे महानायक अमिताभ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 77 वर्षी बिग बी यांनी स्वतः ट्विटरवर ही माहिती दिली. यानंतर त्यांचे मित्र, चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. भारताबाहेरूनही अमिताभ यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ट्विट केले की, "प्रिय अमिताभजी, संपूर्ण देशासोबत मी तुमच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. तुम्ही देशातील लाखो लोकांचे आदर्श आहात. आयकॉनिक सुपरस्टार आहात. आम्ही तुमची योग्यप्रकारे काळजी घेऊ. लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा."

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ट्विट केले की, "श्री. अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह मिळाल्याच्या बातमीने मी दुःखी आहे. त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करते."

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले की, "आपण लवकर बरे व्हावेत यासाठी आम्ही सर्वजण प्रार्थना करतो. गेट वेल सून अमिताभ बच्चनजी."

अशाप्रकारे केंद्रीयमंत्री नितिन गडकरी, भाजप नेता शाहनवाज हुसैन, राष्ट्रावादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह अनेक राजकीय पुढारी आणि दिग्गजांनी अमिताभ यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. 

बॉलिवूडमधूनही केली जातीये प्रार्थना

साउथ इंडियन स्टार्स देखील करताहेत लवकर बरे होण्याची प्रार्थना

अमिताभ बच्चन यांच्यासाठी साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतूनही प्रार्थना केली जात आहे. मोहन लाल, महेश बाबू, ममूटी आणि धनुष यांच्यासह अनेक सेलिब्रिटीजनी सोशल मीडियावर बिग बींसाठी आपल्या भावना व्यक्त करत प्रार्थना केली. 

सीमेपलिकडूनही प्रार्थना 

अमिताभ यांच्यासाठी सीमेपलिकडूनही अर्थात पाकिस्तानातूनही प्रार्थना केली जात आहे. माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने बिग बींसाठी प्रार्थना करत लिहिले की, "गेट वेल सून अमितजी. सीमेपलिकडील तुमचे सर्व चाहते तुम्ही लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत."

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser