आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बिग बींसाठी लाखो प्रार्थना:धर्मेंद्र म्हणाले - तुम्ही दोन दिवसात बरे व्हाल, तर हेमा मालिनी म्हणतात - अमित जी मी तुमच्यासाठी प्रार्थना करतेय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले की, 'आम्ही सर्व प्रार्थना करतो की, तुम्ही लवकर बरे व्हावे, गेट वेल सून अमिताभ बच्चन जी'
  • अभिनेत्री सोनम कपूरने अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना करत लिहले की, गेट वेल सून अमित अंकल, माझे प्रेम आणि प्रार्थना
Advertisement
Advertisement

महानायक अमिताभ बच्चन आणि त्याचा मुलगा अभिषेकची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. शनिवारी त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, त्या दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

ट्विटरवर 77 वर्षीय बिग बींनी स्वत: त्यांच्या कोरोना संसर्गाची माहिती दिली. यानंतर त्याचे मित्र, कलीग्स आणि चाहते त्यानी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करीत आहेत.

अमिताभ बच्चन यांसोबत सर्वात चांगली जोडी असणाऱ्या धर्मेंद्र यांनी आपल्या फार्म हाऊसवरुन ट्विट करुन अमिताभ यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी लिहिले की- अमित, तुम्ही लवकरच बरे व्हाल.

अमिताभ यांच्यासोबत अनेक सुपरहिट देणाऱ्या हेमा मालिनी यांनी लिहिले- अमित जी मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. मला खात्री आहे की तुम्ही आमच्या सर्व प्रार्थनांमधून सुखरूप परत याल.

अभिनेता अक्षय कुमार यांनी अमिताभ यांच्या ट्विटला रिट्विट करत लिहिले की, तुम्ही लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना सर, तुमच्यासाठी प्रेम आणि प्रार्थना 

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ट्वीट केले आहे, "प्रिय अमिताभ जी, संपूर्ण देशासह मी तुमच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतोय. आपण देशातील कोट्यावधी लोकांचे आदर्श आहात. आयकॉनिक सुपरस्टार आहात. आम्ही तुमची काळजी घेऊ. लवकरच तुम्ही बरे व्हाल. "

Advertisement
0