आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

78 वर्षांचे होणार बिग बी:वाढदिवशीही 'कौन बनेगा करोडपती 12'ची शूटिंग करणार अमिताभ बच्चन, महामारीमुळे यावर्षी करणार नाहीत सेलिब्रेशन

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केबीसी 11 च्या सेटवरच बिग बीला मिळाला होता 77 व्या जन्मदिवशी सरप्राइज

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 11 अक्टोबरला आपला 78 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. बिग बी सध्या सोनी टीव्हीचा गेम रियलिटी शो कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या सीजनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या या खास दिवसाचे सेलिब्रेशनही शोच्या सेटवरच केले जाणार आहे. कोरोना महामारीमुळे यावर्षी बच्चन कुटुंबाने जन्मदिवसाचे सेलिब्रेशन करण्याऐवजी एक सामान्य फॅमिली डिनर प्लान केला आहे.

अमिताभ बच्चन 11 अक्टोबरला 78 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. प्रत्येकाला महामारी दरम्यान त्यांचा बर्थडे प्लान जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आयडब्ल्यूमन बज्जच्या रिपोर्टनुसार बिग बींच्या कुटुंबातील सदस्याने सांगितले की, यावर्षी त्यांची काहीच तयारी नाही. ते कुटुंबाच्या सदस्यानी सांगितले की, 'महामारीच्या काळात पार्टी कोण प्लान करते?यावर्षी त्यांचा वाढदिवस सामान्य पध्दतीने साजरा करु. अमिताभजी हे सध्या केबीसी 12 ची शूटिंग करत आहेत आणि वाढदिवशी ते कोमाव्यतिरिक्त काहीच करणार नाहीत.'

जन्मदिनी घरीच होणार फॅमिली डिनर
11 अक्टोबरला रविवारी आहे दरम्यान बच्चन कुटुंबातील सर्व सदस्य घरीच असतील. महामारीमध्ये चांगली गोष्ट म्हणजे पूर्ण कुटुंबाला या खास क्षणी एकत्र राहण्याची संधी मिळाली आहे. यावर त्यांच्या कुटुंबातील सदस्याने सांगितले की, यापूर्वीही अमिताभ बच्चन यांना या गोष्टींची चिंता कधीच नव्हती. अभिषेक बच्चन शूटिंगवर असले तरीही वडिलांच्या वाढदिवशी घरीच राहतात. ऐश्वर्या आणि आराध्याही घरीच आहेत. सध्या मुलगी श्वेता नंदाही सोबतच आहे यामुळे आम्ही घरी एक शांत फॅमिली डिनर करु. यावर्षी घरी कोणीही पाहूणे नसतील.

केबीसी 11 च्या सेटवरच बिग बीला मिळाला होता 77 व्या जन्मदिवशी सरप्राइज
अमिताभ बच्चन प्रत्येकवर्षी आपल्या जन्मदिनी केबीसी शो करत असतात. गेल्यावर्षीही शोच्या सेटवर बिग बींना वाढदिवशी सरप्राइज देण्यात आले होते. गेल्यावर्षी करमवीर स्पेशल एपिसोडमध्ये पॅरालंपिक चॅम्पियन दीपा मलिक आणि मानसी जोशी पाहूण्या बनून पोहोचल्या होत्या. शोमध्ये बिग बींसोबत बोलताना दीपाने सेटवर उस्ताद अमजद अली खान यांना बोलावले. हे बिग बींसाठी मोठे सरप्राइज होते. उस्ताद अमजद यांच्यासोबत त्यांचे दोन मुलं अमान अली खान आणि आयान अली खानही आले होते. शो दरम्यान बिग बींना सरप्राइज देत तिघांनी नवीन गार 'हरिवंश कल्याण' ऐकवले होते. आपल्या वडिलांसंबंधीत राग ऐकूण बिग बी खूप भावूकही झाले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser