आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Amitabh Bachchan Used To Roam In The Streets Of Lucknow In Mirza's Getup Of Gulabo Sitabo, The Locals Could Not Recognize Despite Talking

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुलाबो सीताबो:मिर्झाच्या गेटअपमध्ये लखनौच्या रस्त्यावर फिरायचे अमिताभ, स्थानिक लोकांशी गप्पा मारायचे पण लोक ओळखू शकले नाहीत 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाचे चित्रीकरण अगदी सहज पार पडले, असे दिग्दर्शक शूजीत सरकार यांनी सांगितले.

12 जून रोजी अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सीताबो’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लखनौच्या हजरतगंड आणि त्याच्या आसपासच्या अरुंद वस्तींमध्ये झाले आहे.

विशेष म्हणजे बिग बींच्या चित्रपटातील मिर्झा या व्यक्तिरेखेचा गेटअप असा होता की तेथील स्थानिक लोक त्यांना ओखळूच शकले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, शूटदरम्यान ते तेथील स्थानिक लोकांच्या टोनमध्येच  बोलत असे.  

दिग्दर्शक शुजित सरकार यांनीही याला दुजोरा दिला आहे. शुजित सरकार म्हणाले, ''प्रत्येक सीन खूपच अस्सल आणि खरा असावा अशी आमची सर्वांची इच्छा होती. यासाठी आम्ही लखनौच्या हजरतगंज चौकात आणि आजूबाजूच्या अरुंद रस्त्यांवर शूट करायचो. या ठिकाणी शूटिंग करणे आव्हानात्मक होते कारण तेथे गर्दी जमण्याची शक्यता असायची. अशा परिस्थितीत आम्ही तिथे पूर्ण तयारीनिशी शूट करायचो. अवघ्या अर्ध्या तासात प्रत्येक सीन शूट करायचो. तोपर्यंत येथे काय घडत आहे हे फारच थोड्या लोकांना समजायचे.''

  • अमिताभ यांना ओळखणे कठीण होते

मिर्झाच्या गेटअपमध्ये लोक मिस्टर बच्चन यांना ओळखू शकले नाहीत. अमिताभ बच्चन यांना लोकांनी ओळखू नये ही माझीही इच्छा होती. ते मिर्झासारखा दिसावे आणि त्यांचा आवाजही तसाच असावा, यावर मी फोकस केले होते. शूटनंतर प्रत्येक दिवशी बच्चन साहेब त्या अरुंद वस्तीमध्ये फिरायचे. स्थानिकांशी गप्पा मारायचे. त्या शहराविषयी त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करायचे. पण आपण बिग बींसोबत बोलतोय हे लोकांना समजलेच नाही. हे सर्व अगदी सहज घडले. 

बातम्या आणखी आहेत...