आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेमोसाठी प्रार्थना:रेमो डिसूजासाठी बिग बींनी केली प्रार्थना, म्हणाले - ‘रेमो लवकर बरा हो… तू लवकर बरा व्हावा म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो...'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या आयसीयूमध्ये रेमोवर उपचार सुरु आहेत.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाला 11 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

रेमो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील रेमोसाठी प्रार्थना केली आहे. अमिताभ यांनी सोशल मीडियावर लिहिले, ‘रेमो लवकर बरा हो… तू लवकर बरा व्हावा म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो.. आणि तुम्ही सर्वांनी रेमोसाठी प्रार्थना केली त्याबद्दल तुमचे आभार.’

रेमोवर झाली अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया
वृत्तानुसार, रेमोला 11 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला होता. 46 वर्षीय रेमोच्या हार्टमध्ये ब्लॉकेज होते, जे अँजिओप्लास्टीनंतर काढण्यात आले. सध्या तो आयसीयूत अूसून त्याची प्रकृती स्थिर आहे.

कोरिओग्राफरसोबत दिग्दर्शक आहे रेमो
रेमो डिसूझाचा जन्म 2 एप्रिल 1972 रोजी कर्नाटकच्या बेंगळुरू येथे झाला. रमेश यादव हे त्याचे खरे नाव आहे. त्याच्या वडिलांचे नाव गोपी नायक आहे, रेमो डिसूझाने गुजरातमधील जामनगर येथून शिक्षण घेतले. डिझाइनर असलेल्या लीजेलशी त्याचे लग्न झाले आहे. ध्रुव आणि गबिरिल ही त्याच्या मुलांची नावे आहेत.

रेमो डिसूझाने अनेक हिट चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत. नृत्य दिग्दर्शक म्हणून 1995 मध्ये त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. याआधी तो बॅकग्राउंड डान्सर होता. 2000 मध्ये त्याने 'दिल पे मत ले यार' या चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शन केले होते. 'तहजीब', 'कांटे', 'धुम', 'रॉक ऑन', 'स्टूडेंट ऑफ द ईयर', 'ये जवानी है दीवानी', 'एबीसीडी 2', 'बाजीराव मस्तानी' आणि 'कलंक' चित्रपटासाठीदेखील त्याने नृत्य दिग्दर्शन केले आणि अनेक चित्रपटासांठी पुरस्कार देऊन त्याचा गौरवदेखील झाला आहे.

कोरिओग्राफर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर रेमोने दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला. 'फालतू' या चित्रपटासह त्याने 2013 मध्ये आलेल्या ‘एबीसीडी’ या डान्सवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन केले. याशिवाय 'एबीसीडी 2' आणि 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' हे देखील त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. याशिवाय तो 'डान्स इंडिया डान्स', 'झलक दिखला जा' आणि 'डान्स प्लस' या शोचा परीक्षकही होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser