आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर कविता:78 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले -  'मी दृष्टिहिन असलो तरी दिशाहिन नाही'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभ बच्चन यांनी नुकतीच एक कविता चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका डोळ्याची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली. लवकरच दुसऱ्याही डोळ्याची शस्त्रक्रिया होणार असल्याचे त्यांनी चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. बिग बी आता रुग्णालयातून घरी पोहोचले आहेत. आता ते हळूहळू बरे होत आहेत. त्यांनी नुकतीच एक कविता चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

त्यांनी त्यांची सध्याची परिस्थिती या कवितेतून सांगितली आहे. ते म्हणतात की, मी दृष्टिहिन असलो तरी दिशाहिन नाही. त्यांनी आपल्या चाहत्यांचे आणि घरच्यांचेही त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि त्यांच्या काळजीबद्दल या कवितेच्या माध्यमातून आभार मानले आहेत.

बिग बींच्या दुस-या डोळ्यावरही लवकरच होणार शस्त्रक्रिया
बिग बींनी काही दिवसांपूर्वी आपल्या ब्लॉगमध्ये त्यांच्यावर अजून एक शस्त्रक्रिया लवकरच होणार असल्याची माहिती दिली होती. 'बरे होण्याचा वेग कमी आहे. आणि दुस-या डोळ्याचीही शस्त्रक्रिया होणे बाकी आहे. जर सगळं व्यवस्थित पार पडलं तर विकास बहलसोबत मी माझ्या नवीन चित्रपटासाठी लवकरच काम सुरु करू शकेन, ज्याचे नाव सध्या तरी गुड बाय असे आहे,' असे बिग बींनी सांगितले होते.

बिग बींचे आगामी प्रोजेक्ट्स
अमिताभ बच्चन सध्या अजय देवगण दिग्दर्शित 'मे डे' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी होते. या चित्रपटात त्यांच्यासह अजय देवगण, रकूल प्रीत सिंग आणि बोमन इराणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय त्यांच्या आगामी 'झुंड' या चित्रपटाची रिलीज डेटही निश्चित झाली आहे. हा चित्रपट येत्या 18 जूनला रिलीज होणार आहे. याशिवाय 'ब्रह्मास्त्र', 'चेहरे' आणि 'बटरफ्लाय' हे त्यांचे आणखी काही आगामी चित्रपट आहेत.

बातम्या आणखी आहेत...