आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खाननंतर आता अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ:बिग बींना X श्रेणी सुरक्षा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरस्टार सलमान खाननंतर आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र सरकारने त्यांना एक्स श्रेणीची सुरक्षा दिली आहे. यापूर्वी बिग बींना मुंबई पोलिसांची सामान्य सुरक्षा देण्यात आली होती.

अनुपम-अक्षय यांनाही X ग्रेड सुरक्षा मिळाली
X श्रेणी सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक 24 तास तैनात असतात. म्हणजेच आता एक्स ग्रेड सुरक्षेअंतर्गत बिग बी यांच्या सुरक्षेसाठी आणखी 2 गार्ड तैनात केले जातील, त्यापैकी एक पीएसओ आहे. म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी आता 3 पोलीस वेगवेगळ्या शिफ्टमध्ये राहणार आहेत. अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांना देखील एक्स श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचबरोबर सलमानला Y+ श्रेणी सुरक्षा मिळाली आहे, ज्यामध्ये 2 कमांडो आणि 2 PSO आणि इतर पोलिसांचा समावेश आहे.

सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत
सलमान खानला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचे वडील सलीम मॉर्निंग वॉकला गेले होते तेव्हा त्यांना एक अनोळखी पत्र मिळाले होते, ज्यात त्यांना आणि सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. 'सलीम, सलमान लवकरच तुमचा मूसेवाला करु' अशी धमकी या पत्रात देण्यात आली होती. यानंतर सलीम खान यांनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधून याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

'ऊंचाई'मध्ये दिसणार आहेत अमिताभ बच्चन
बिग बी अलीकडेच 'ब्रह्मास्त्र' आणि 'गुडबाय' या चित्रपटात दिसले होते. त्यांचा 'ऊंचाई' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता, सारिका, परिणीती चोप्रा आणि डॅनी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...