आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील तुमच्या मोबाइलवरील कॉलर ट्यून शुक्रवारपासून बदलेल. वृत्तानुसार 16 जानेवारीपासून लसीकरणावर आधारित जसलीन भल्ला यांच्या आवाजातील नवी कॉलर ट्यून येईल. देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असल्याने, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ही ट्यून बदलण्यात येणार आहे. कॉलर ट्यून लवकरात लवकर हटवण्यात यावी, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ए. के. दुबे आणि पवन कुमार यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या कॉलर ट्यून संदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. ‘या कॉलर ट्यूनमुळे सगळेच ग्राहक त्रस्त असून, ही ट्यून लवकरात लवकर बंद करण्यात यावी, अशी सगळ्यांच्या वतीने विनंती’, असे या याचिकेत म्हटले होते.
अभिनेता सोनू सूदने संगीत क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याच्या ‘पागल नहीं होना’ या गाण्याचा व्हिडिओ आज रिलीज झाला आहे. याचे पोस्टरदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये सोनू सोबत अभिनेत्री आणि गायिका सुनंदा शर्मा दिसत आहे. यात सोनू एका लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. सोनूने याविषयी सांगितले, हा माझा पहिला म्युझिक व्हिडिओ अाहे. हे गाणे सैनिक आणि त्यांच्या पत्नींना समर्पित आहे.
अभिनेता विनीत कुमार सिंह अभिनीत ‘आधार’ चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज करण्यात आले. याची कथा ग्रामीण भारताच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात आधार कार्ड बनवण्यासाठी एका व्यक्तीला येणाऱ्या अडचणीवर दाखवण्यात येणार आहे. तो जमुआ, झारखंडमधील व्यक्ती असते, त्याला कसेही करुन आधार नंबर मिळवायचा असतो. चित्रपटात रघुबीर यादव, सौरभ शुक्ला आणि संजय मिश्रा सारखे दिग्गज कलाकारदेखील आहेत. खरं तर, या चित्रपटाचा ऑक्टोबर 2019 मध्ये बुसान अंतरराष्ट्रीय सिने महोत्स्वात (बीआयएफएफ) च्या 24 आवृत्तीत प्रीमियर झाले आहे. हा चित्रपट 5 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.
अभिनेता रवी तेजाचा चित्रपट ‘क्रॅक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लॉकडाऊननंतर पहिल्याच चित्रपटाची चांगली सुरुवात झाल्याने आता विजय अभिनीत ‘मास्टर’चीदेखील अॅडव्हास बुकिंग सुरू झाली होती. खरं तर, चित्रपटगृहात 50 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी आहे. 9 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘मास्टर’ 13 जानेवारीला रिलीज झाला.
दिग्दर्शक प्रशांत नीलने प्रभाससोबत आपल्या अॅक्शन चित्रपट ‘सालार’ची घोषणा फार अधीच केली होती. आता या चित्रपटाचे शूटिंगदेखील सुरू होणार आहे. यात प्रभास नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. ‘सालार’चे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शूटिंग सुरू होणार आहे. त्यासाठी निर्माते या महिन्याच्या 15 तारखेला पूजा करणार आहेत. सिने निर्माते एस.एस राजामौली आणि दक्षिणेचे अनेक मोठे अभिनेते या पूजेत सहभागी होतील. याविषयी प्रभासने सांगितले, मी हैदराबादमध्ये मुहूर्त पूजेनंतर चित्रपटाचे शूटिंग सुरू करणे आणि आपला लूक सार्वजनिक करण्यासाठी उताविळ झालो आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.