आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली 11 जानेवारी रोजी एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले. बाळाच्या जन्मानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरून टीम इंडियाविषयी एक गमतीशीर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंच्या नावे लिहिली आहेत. खास गोष्ट म्हणजे हे सर्वच खेळाडू मुलीचे बाबा आहेत. आणि आता विराट आणि अनुष्कालाही मुलगी झाली आहे. यावर त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये महेंद्रसिंग धोनी, हरभजन सिंग, नटराजन, उमेश यादव, मोहम्मद शमी, आर. अश्विन, रोहित शर्मा, गौतम गंभीर, सुरेश रैना, ऋद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे या 11 क्रिकेटपटूंची नावे लिहून भावी महिला क्रिकेट टीम तयार केली जात आहे, असे बिग बींनी म्हटले आहे. त्यांनी पुढे लिहले की, ‘… आणि महेंद्रसिंग यालाही एक मुलगी आहे. ती संघाची कर्णधार असेल का?, असे बिग बींनी म्हटले आहे.
T 3782 - An input from Ef laksh ~
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 13, 2021
"... and Dhoni also has daughter .. will she be Captain ? 🙏'' pic.twitter.com/KubpvdOzjt
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा ही अभिनेता सलमान खान आणि अभिनेता आमिर खानची फॅन होती. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये अभिषेकने बहिणीविषयी हा खुलासा केला आहे. जेव्हा सलमान खानचा ‘मैंने प्यार किया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा श्वेता बोर्डिंग स्कूलमध्ये होती. तिने हा चित्रपट व्हीसीआरवर पाहिला होता. त्यांच्या शाळेत चित्रपट पाहण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे तिने चित्रपट ऑडिओ कॅसेटमध्ये रेकॉर्ड करुन घेतला होता आणि ती कॅसेट ती ऐकायची. अभिषेकने पुढे सांगितल्यानुसार, श्वेता आमिरची देखील मोठी फॅन होती. जेव्हा आमिरला याबाबत कळले तेव्हा त्याला आनंद झाला. त्यानंतर तो श्वेताच्या प्रत्येक वाढदिवशी तिला पत्र लिहून पाठवायचा.
अभिनेत्री जया प्रदा, अभिनेता राज बब्बर, अभिनेता गुरप्रीत गुग्गी, अभिनेत्री इहाना ढिल्लन यांनी आपल्या आगामी 'भूत अंकल : तुस्सी ग्रेट हो' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली आहे. सोनी टीव्हीने कपिल शर्मा शोच्या आगामी भागाचा प्रोमो त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यात जया प्रदा आणि राज बब्बर त्यांच्या काळातल्या अनेक मजेशीर गोष्टी सांगताना दिसतात. या शोमध्ये कपिलने जया प्रदा यांना एक प्रश्न विचारला की, चित्रपटाच्या सेटवर सगळ्यात जास्त फ्लर्ट कोणता अभिनेता करायचा? या प्रश्नावर जया प्रदा यांनी लगेच उत्तर न देता राज बब्बर यांना विचारले सांगू का? त्यावर ते सांगा म्हणताच जया प्रदा सांगतात की, धर्मेंद्र जी. धर्मेंद्र यांचे नाव ऐकताच तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना हसू अनावर झाले आहे.
दिग्दर्शक के.व्ही. गुहान यांच्या आगामी सायबर थ्रीलर चित्रपट 'WWW'(Who…Where…Why) चा टीझर प्रदर्शित झाला आहे. राणा डग्गुबाती हा या चित्रपटाचा मुख्य नायक आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात अदिथ अरुण, राजकुमार सतीश, शिवानी राजशेखर, प्रियदर्शी, विवा हर्ष, सत्यम राजेश, रियाज खान आणि दिव्य दर्शन मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात चार मित्रांची कहाणी दाखविली आहे. जे सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात आणि त्यांना ऑनलाईन धमकी मिळते. या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर 12 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाले. ज्यामध्ये राणा डग्गुबाती दिसतोय. हा चित्रपट तामिळ आणि तेलगूमध्ये प्रदर्शित होईल.
सुपरस्टार विजय सेतुपतिचा आगामी चित्रपट ‘अप्पेना’चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात विजय सेतुपती मुख्य खलनायकाच्या भूमिकेत आहे. चित्रपटामध्ये पंज वैष्णव तेजसोबत कृती शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रोमोमध्ये या दोघांमधील केमिस्ट्री दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन बुची बाबू सना यांनी केले आहे. हा चित्रपट तेलगूमध्ये प्रदर्शित होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.