आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनमध्ये ग्रॅज्युएशन:अमिताभ यांची नात नव्या झाली ग्रॅज्युएट, कोरोनामुळे रद्द झाला पदवी प्रदान सोहळा म्हणून घरीच केले सेलिब्रेशन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नव्यानं तिचा खास दिवस घरी तिच्या शैलीत साजरा केला.

अमिताभ बच्चन यांची नात  आणि श्वेता बच्चन नंदा हिची मुलगी नव्या नवेली नंदा ही पदवीधर झाली आहे. बिग बींनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना ही माहिती देऊन आपला आनंद व्यक्त केला. कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालयाचा दीक्षांत सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. बिग बींनी सांगितल्यानुसार, नव्यानं तिचा खास दिवस घरी तिच्या शैलीत साजरा केला.

अमिताभ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "नात नव्या ... एका तरुण विद्यार्थ्याच्या जीवनातील सर्वात महत्वाचा दिवस...  ग्रॅज्युएशन डे. ती न्यूयॉर्क कॉलेजमधून पदवीधर झाली.  पण समारंभ कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रद्द झाला. ती जाऊ शकली नाही. आम्ही या सोहळ्यानिमित्त तिच्याबरोबर जाणार होतो. पण तिला गाऊन आणि कॅप घालायची होती. म्हणून स्टाफने तातडीने गाऊन आणि कॅप शिवून दिली. तिने ते परिधान केले आणि आपल्या घरीच सेलिब्रेशन केले. नव्या तुझा आम्हाला अभिमान वाटतो. देव तुझ्यावर कृपा करो. खरोखर सकारात्मक आनंदी दृष्टीकोन आहे. लव्ह यू."

याशिवाय अमिताभ बच्चन यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये नव्या तिची आई श्वेतासोबत दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये बिग बींनी लिहिले. "श्वेताची प्रतिक्रिया जयासारखी आणि नव्याची प्रतिक्रिया श्वेतासारखी, जेव्हा श्वेता  तरुण होती." 

श्वेताने लिहिले- नव्या, आम्हाला तुझा अभिमान आहे

अमिताभ यांची मुलगी आणि नव्याची आई श्वेता बच्चनने सोशल मीडिया अकाऊंटवर सविस्तर माहिती दिली आहे. तिने लिहिले, "2020 चा क्लास. नव्यानं आज तिचं कॉलेज पूर्ण केलं. ती आणि यावर्षी पदवीधर होणारे लोक समारंभात जाऊ शकले नाहीत. म्हणून आम्ही DIY (Do It Yourself) चा निर्णय घेतला. एक चार्ट पेपर कॅप आणि काळ्या टेंटिंगच्या स्क्रॅपपासून गाऊन हाताने शिवला." पुढे नव्याला शुभेच्छा देताना लिहिले, आम्हाला तुझा अभिमान आहे.

अभिषेकला आठवला नव्याचा कॉलेजचा पहिला दिवस

नव्याचा मामा अभिषेक बच्चननेही सोशल मीडियावर तिचे अभिनंदन केले आहे. त्याने लिहिले, "माझी नव्या, ग्रॅज्युएट झाल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. लॉकडाऊनमुळे आम्ही हा दिवस तुझ्या कॉलेज आणि क्लासमेट्ससोबत सेलिब्रेट करु शकत नाहीये. पण ही उणीव तू गार्डनमध्ये पूर्ण केली. असे वाटते की जणू हे कालच घडले, तुला फ्रेशर म्हणून  वसतिगृहाच्या खोलीत घेऊन आम्ही घेऊन जात होतो. थांबा… आठवले...  ‘आम्ही’ नाही ’मी’. (तू कायमच मामाकडून वजन उचलून घेण्यास यशस्वी ठरली. ) देवाचा तुझ्यावर कायम आशीर्वाद असो."

बातम्या आणखी आहेत...