आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल राजू श्रीवास्तव यांना आठव्या दिवशीही शुद्ध आलेली नाही. 10 ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना 4 दिवसांपासून 100 डिग्री सेल्सिअस ताप आहे. संसर्गाचा धोका लक्षात घेता कुटुंबातील सदस्यांचा आयसीयूमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. राजू यांची तब्येत सुधारण्यासाठी ऑडिओ थेरपीचा वापर केला जात आहे.
गजोधर-संकठाचे किस्से ऐकवले जात आहेत
राजू यांचे भाऊ आणि कॉमेडियन दीपू श्रीवास्तव म्हणाले, "भैयाची रिकव्हरी स्लो आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना शुद्धीवर येण्यासाठी 4 ते 5 दिवस लागू शकतात. कुटुंबातील सदस्यांचे रेकॉर्डेड ऑडिओ संदेश त्यांना ऐकवले जात आहेत. त्यांना गजोधर आणि संकठाचे किस्सेही, त्यांच्याच आवाजात ऐकवले जात आहेत. अमिताभ बच्चन यांनीही गेट वेल सूनचा ऑडिओ मेसेज पाठवला होता, तीसुद्धा त्यांना ऐकवली जातेय,' असे दीपू यांनी सांगितले.
तापामुळे व्हेंटिलेटर काढता येत नाहीये
राजू श्रीवास्तव यांच्या मोठ्या भावाच्या म्हणण्यानुसार, तापामुळे डॉक्टरांनी व्हेंटिलेटर न काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, म्हणून कुटुंबीयांच्या परवानगीने कोणालाही त्यांच्या बेडजवळ जाण्याची परवानगी नाहीये. कुटुंबातील सदस्यांना राजू यांना आयसीयूच्या बाहेरील काचेच्या खिडकीतून पाहण्याची परवानगी आहे.
नळीवाटे दूध दिले जात आहे
राजू यांच्या पीआरओने सांगितल्यानुसार, "त्यांना दररोज नळीतून सुमारे अर्धा लिटर दूध दिले जात आहे. प्रत्येक उपचाराला ते चांगला प्रतिसाद देत आहेत. शरीरातील हालचालही सातत्याने वाढत आहे. ऑक्सिजन सपोर्टही 10% राहिला आहे. रक्तदाबही नॉर्मल झाला आहे. फक्त आता ते शुद्धीवर येण्याची वाट बघितली जात आहे."
10 ऑगस्ट रोजी व्यायाम करत असताना राजू यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची पुष्टी केली होती. कानपूरचे माजी आमदार सतीश निगम हेही राजूची प्रकृती जाणून घेण्यासाठी एम्समध्ये पोहोचले. उन्नाव सदरचे आमदार पंकज गुप्ता यांनी फोनवरून त्यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेतले. पीएमओ आणि मुख्यमंत्री कार्यालयातून सातत्याने त्यांच्या प्रकृतीविषयी अपडेट घेतले जात आहेत.
राजू यांचे प्रसिद्ध पात्र गजोधर आहे
राजू श्रीवास्तव यांची टिपिकल कानपुरिया शैली संपूर्ण देशाला आवडते. गजोधर आणि संकठा ही राजूच्या मूळ गावात राहणाऱ्या लोकांची नावे आहेत. आता या दोन्ही व्यक्ती या जगात नाहीत.
राजू श्रीवास्तव लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.