आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजी बच्चन यांचा वाढदिवस:इंदिरा गांधींची जवळची मैत्रिण होती बिग बींची आई, सोनिया आणि राजीव गांधी यांचे लावून दिले होते लग्न

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तेजी यांना समाजसेविका म्हणूनही ओळखले जाते.

अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री तेजी बच्चन यांचा जन्म 12 ऑगस्ट 1914 रोजी पंजाबच्या लायलपूर (सध्या पाकिस्तानात) मध्ये झाला होता. त्या शीख कुटुंबातील होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार खजान सिंग होते. ते पंजाबमध्येच बॅरिस्टर होते. तेजी यांना समाजसेविका म्हणूनही ओळखले जाते.

थिएटर आर्टिस्ट
तेजी बच्चन प्रसिद्ध गायिका आणि थिएटर आर्टिस्ट होत्या. त्यांनी दिल्ली आणि अलाहाबादमध्ये अनेक ग्रुप्स बरोबर कार्यक्रम केले होते. लग्नानंतर त्यांनी शेक्सपिअरच्या एका नाटकात बिग बींबरोबर स्टेज शेअर केले होते. हरिवंशराय बच्चन यांनी स्वतः ते ट्रान्सलेट केले होते.

इंदिरा गांधींशी जवळची मैत्री
तेजी बच्चन आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्यात जवळची मैत्री होती. त्या दोघी नेहमी सोबत दिसायच्या. हरिवंशराय बच्चन यांची तेजी यांच्याशी लाहोरच्या फतेहचंद कॉलेजमध्ये भेट झाली होती. त्याठिकाणी त्या शिकवायला होत्या. 1941 मध्ये त्यांनी लव्ह मॅरेज केले होते.

लग्नापूर्वी तेजी यांच्या घरी राहिल्या होत्या सोनिया गांधी
राजीव आणि सोनिया यांच्या तीन वर्षांच्या डेटिंगनंतर 1968 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले होते. भारतात आल्यानंतर लग्नापर्यंत सोनिया बच्चन कुटुंबासोबत राहिल्या. देशाच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मुलाच्या प्रेमसंबंधाची माहिती नव्हती. सोनिया आणि राजीव यांच्या संबंधाची माहिती इंदिरांना करुन देण्याची जबाबदारी तेजी बच्चन यांच्यावर सोपवण्यात आली होती. यासाठी जवळपास दोन महिने गेले. तोपर्यंत सोनिया बच्चन कुटुंबासोबत राहात होत्या. अखेर इंदिरांनी विवाहाला मान्यता दिली आणि 25 फेब्रुवारी रोजी अमिताभ बच्चन यांच्या घरी राजीव-सोनिया विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या वेळी सोनिया गांधींचे कुटुंब इटलीत होते. त्यामुळे अमिताभ यांचे वडील हरिवंशराय आणि आई तेजी यांनी सोनियांचे कन्यादान केले होते.

वयाच्या 93 व्या वर्षी झाले निधन
तेजी बच्चन यांना अमिताभ आणि अजिताभ बच्चन ही दोन मुले आहेत. अमिताभ यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, तर अजिताभ हे बिझनेसमन आहेत. 21 डिसेंबर 2007 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी तेजी बच्चन यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...