आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सूर्यवंशम'ची 22 वर्षे:अभिनेत्री सौंदर्याचा वयाच्या 31 व्या वर्षी प्लेन क्रॅशमध्ये झाला होता मृत्यू, 12 वर्षांत केले होते 114 चित्रपटांत काम

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत झाले होते लग्न

'सूर्यवंशम' (1999) हा चित्रपट प्रदर्शनानंतर फ्लॉप झाला, पण आज तो सर्वात चर्चित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट 21 मे 1999 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्या रघू झळकली होती. चित्रपटाच्या रिलीजच्या पाच वर्षांनी सौंदर्याचे एका अपघतात निधन झाले. त्यावेळी ती केवळ 31 वर्षांची आणि गरोदर होती. तिच्या कुटुंबियांना तिचा मृतदेहही पाहायला मिळाला नव्हता.

12 वर्षांच्या करिअरमध्ये 114 चित्रपटांत केले होते काम

1992 मध्ये गंधर्व या कन्नड चित्रपटाद्वारे सौंदर्याने मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले होते. याच वर्षी तिने 'Raithu Bharatham' हा तेलुगु चित्रपट केला होता. 12 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये सौंदर्याने 114 चित्रपटांमध्ये काम केले होते. तिच्या निधनानंतर ऑगस्ट 2004 मध्ये तिचा शेवटचा कन्नड चित्रपट 'Apthamitra' प्रदर्शित झाला होता.

असा झाला होता अपघात
17 एप्रिल 2004 रोजी सौंदर्या भारतीय जनता पार्टी आणि तेलुगू देसम पार्टीच्या निवडणूक प्रचारासाठी करिमनगर येथे जात होती. सकाळी 11.05 वाजता फोर सीटर प्रायवेट एअरक्राफ्ट मध्ये बंगळुरूच्या जक्कुर एअरफिल्ड येथून उड्डाण केले आणि जेव्हा ते 100 फूट वरती गेले तेव्हा ते क्रॅश झाले. एअरक्राफ्टमध्ये सौंदर्याव्यतिरीक्त तिचा भाऊ अमरनाथ, हिंदू जागरण समितीचे सेक्रेटरी रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप होते. दुर्घटनेत या चौघांचाही मृत्यू झाला होता.

सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत झाले होते लग्न
सौंदर्याचे खरे नाव सौम्या सत्यनारायण होते. तिचा जन्म 18 जुलै 1972 रोजी कर्नाटकातील कोलार येथे उद्योजक आणि कन्नड चित्रपटांचे लेखक के. एस. नारायण यांच्या घरी झाला
होता. मृत्यूच्या वर्षभरापूर्वीच सौंदर्याचे सॉफ्टवेअर इंजिनिअर जी. एस. रघू यांच्यासोबत लग्न झाले होते. रिपोर्ट्सनुसार, 2010 मध्ये जी. एस. रघू यांनी अर्पिता नावाच्या तरुणीसोबत दुसरे
लग्न केले.

बातम्या आणखी आहेत...