आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

उरल्या फक्त आठवणी:बासू दांबरोबर आठ रोमँटिक चित्रपट करणारे अमोल पालेकर जड अंतःकरणाने म्हणाले - त्यांना त्यांचे श्रेय कधीच मिळाले नाही

अमित कर्ण, मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बासू चटर्जी यांचा जन्म 10 जानेवारी 1930 रोजी राजस्थानच्या अजमेर शहरात झाला होता. त्यांनी बालपण आणि तारुण्याचे दिवस मथुरामध्ये घालवले.
Advertisement
Advertisement

प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चटर्जी आता आपल्यात नाहीत. ते अशा दिग्दर्शकांपैकी एक होते, ज्यांनी जीवनातील सोप्या गोष्टी अगदी विलक्षण पद्धतीने मोठ्या स्क्रीनवर सांगितल्या. त्यांच्यासोबत सर्वाधिक चित्रपट करणारे अभिनेते अमोल पालेकर यांनी दिव्य मराठीसोबत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. हृषिकेश मुखर्जी यांच्याशी तुलना करताना पालेकर म्हणाले की, बासु दा यांना जे श्रेय द्यायला हवे होते ते प्रसारमाध्यमांनी कधीही दिले नाही.

पालेकर म्हणाले, 'त्यांच्याबरोबर सर्वाधिक म्हणजे आठ चित्रपट करण्याचा मला बहुमान मिळाला. कॉमन मॅन त्यांच्या चित्रपटांचा नायक असायचा. त्यांचे सर्व चित्रपट सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित होते. त्यात कोणताही मोठा मेलाड्रामा नव्हता. त्यांच्या चित्रपटात खलनायकही नसायचा, जो मेलोड्रामासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो.'

सामान्य माणसाच्या आयुष्यावर चित्रपट केले

ते पुढे म्हणाले, 'आमच्या दोघांचा' रजनीगंधा 'हा पहिला चित्रपट होता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण चित्रपटात नायक त्याच्या नायिकेला 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' हे बोलत नाही. नायिकेला भेटायला उशीरा येतो. आल्यानंतर तो ऑफिसबद्दल बोलतो. कुठेही प्रेमाचा प्रश्नच उद्भवत नाही. आपल्या चित्रपटांमध्ये बासू दा या प्रकारची पूर्णपणे भिन्न दुनिया आणत असत. त्यांनी सर्वसामान्यांविषयी चित्रपट बनविले ज्यांचे एक सामान्य जग आहे आणि म्हणून लोकांना ते खूप आवडले.

सुपरस्टारच्या चित्रपटांच्या काळात त्यांचे चित्रपट चालत असत

पालेकर पुढे म्हणाले, बासू दा यांनी  70 आणि 80 च्या असे चित्रपट बनवले, जेव्हा ग्लॉसी चित्रपटांचा दबदबा होता. एकीकडे अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन आणि दुसरीकडे रोमँटिक हीरो राजेश खन्ना, तिसरीकडे हीमॅन धर्मेंद्र आणि चौथीकडे डान्सिंग स्टार जितेंद्र यांच्यात बासू दांचे चित्रपट समांतर चालत होते.  तिथे लोकांना एक पूर्णपणे वेगळंच जग पाहायला मिळालं आणि तेही त्याचा आनंद लुटत होते. हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि तेही वेगळ्या सेन्स ऑफ ह्युमरसोबत. 

ऋषी दांनी त्यांच्यानंतर असे चित्रपट बनवले

पालेकरांच्या म्हणण्यानुसार, 'बासू दा यांनी ज्या धाटणीचे चित्रपट बनवले त्याप्रकारेच चित्रपट नंतर ऋषीकेश दांनी केले होते. मग ते 'चुपके चुपके' किंवा 'गोलमाल' असो किंवा ऋषिकेश दा यांनी माझ्यासह बनविलेले सर्व चित्रपट, जे नंतर त्यांनी बनवले.  त्या सर्वांमध्ये बासू दा सर्वांचे पायोनियर होते.

'बासू दा यांना त्यांचे श्रेय मिळाले नाही'

'शेवटी मी हे सांगू इच्छितो की, बासू दांना जेवढे क्रेडिट द्यायला हवे होते, तेवढे आपल्या प्रसारमाध्यमांनी त्यांना दिले नाही. कारण आपल्या अपेक्षांमध्ये ट्रॅजेडी सादर करणे खूप मोठे कौशल्य मानले जाते. किंवा एखाद्याने सामाजिक विषयांवर चित्रपट बनवला असेल तर त्याचे कौतुक केले जाते. बासू दांनी हे सर्व न करता नेहमीच आश्चर्यकारक चित्रपट बनवले.  त्यावेळी माध्यमांनी बासू दा यांचे योग्य मूल्यांकन करायला हवे होते, त्यांना त्यांचे श्रेय मिळायला हवे होते.' (अमित कर्ण यांना सांगितल्याप्रमाणे)

Advertisement
0