आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायरेक्टर्स कट:श्रद्धा बाहेर पडली अन् परिणीती ‘सायना’ झाली, काय घडले नेमके सांगत आहेत दिग्दर्शक अमोल गुप्ते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रद्धा या चित्रपटासाठी तयार होती. मात्र, तिला डेंग्यू झाला.

बॅडमिंटन चॅम्पियन सायना नेहवालवर आधारित चित्रपट ‘सायना’ प्रदर्शित झाला. या चित्रपटातून श्रद्धा कपूर बाहेर का पडली, परिणीती चोप्रा अचानक ‘सायना’ कशी झाली? हे गुपित सांगत आहेत दिग्दर्शक अमोल गुप्ते

  • ‘सायना’ या चरित्र चित्रपटासाठी सायना नेहवालला कसे तयार केले?

माझ्या एका मित्राजवळ पूर्वीच सायनावर चित्रपट बनविण्याचे हक्क होते. अमोल गुप्ते आपल्या जीवनावर चित्रपट बनवू इच्छितो. असे त्याने सायना आणि त्यांच्या कुटुंबाला सांगितले. मी त्यांना भेटायला हैदराबादला गेलो. ते खूप आनंदी झाले. सगळ्यांना माझे काम माहीत होते. आपला चरित्रपट एक योग्य व्यक्ती करणार आहे याची त्यांना खात्री होती. त्यामुळे मला जास्त आनंद झाला.

  • श्रद्धा कपूर या चित्रपटात काम करणार होती. मग तिने चित्रपट का सोडला?

श्रद्धा या चित्रपटासाठी तयार होती. मात्र, तिला डेंग्यू झाला. त्यामुळे ती कमजोर झाली होती. दुसरा एखादा चित्रपट राहिला असता तर वेगळी गोष्ट होती. हा क्रीडा प्रकारावर आधारित चित्रपट आहे. जिथे 12 तास बॅडमिंटन कोर्टवर उभे राहावे लागते. फिटनेसवर काम करायचे होते. हे सगळे कसे झाले असते? त्यानंतर श्रद्धाकडे ‘छिछोरे’ आणि ‘स्ट्रिट डान्सर 3’ सारखे चित्रपट होते. मग भूषणजी ‘सायना’साठी परिणीती चोप्राला घेऊन आले. एकंदर श्रद्धा कसल्या तरी भांडणातून वगैरे या चित्रपटापासून वेगळी झाली नाही.

  • परिणीतीने या सिनेमासाठी काय परिश्रम घेतले?

या चित्रपटावर गेल्या पाच वर्षांपासून काम सुरू आहे. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये परिणीती जोडली गेल्यानंतर पुन्हा नव्याने काम सुरू केले. तिला सायनाचे कोच श्रीकांत वाड यांनी प्रशिक्षण दिले. परिणीतीने स्वत: सायनासारखे दिसण्यासाठी सहा महिने प्रशिक्षण घेतले. कोर्ट, घर प्रत्येक ठिकाणी परिणीतीने सायना दिसण्यासाठी स्वत:चा त्याग केला.

बातम्या आणखी आहेत...