आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संस्मरणीय किस्से:मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी अमरीश पुरींनी स्वतः डिझाइन केला होता कॉश्च्युम, दिग्दर्शक बोनी कपूर यांनी इम्प्रेस होऊन दिले होते 10 हजार रुपये 

उमेशकुमार उपाध्याय. मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 22 जून 1932 मध्ये पंजाब येथे अमरीश पुरी यांचा जन्म झाला होता.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमरीश पुरी आता आपल्यात नाहीत, मात्र त्यांनी रुपेरी पडद्यावरील आपल्या पात्रांना कायमचे अमर केले आहे. मिस्टर इंडियातील मोगॅम्बो असो किंवा डीडीएलजेचे बाबूजी... अमरीश, त्यांनी आपल्या अभिनयाने पात्रांना पडद्यावर जीवंत केले. आज अमरीश पुरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे मित्र बोनी कपूर यांनी भास्करशी झालेल्या संभाषणात त्यांच्याशी संबंधित खास किस्से शेअर केले आहेत.

  • 'हम पांच'साठी स्वतः डिझाइन केला होता विग

माझ्या 'हम पांच' या चित्रपटातून अमरीश पुरी यांना स्टारडम मिळाले होते. ते आपल्या कामासाठी इतका समर्पित होते की, प्रत्येक गोष्टीच्या तपशीलात ते जात असे. या चित्रपटात अमरीशजी यांना दिग्दर्शक बापूजींनी इशा-यातून काहीतरी सांगितले आणि स्केच बनवून दिला. त्यानंतर अमरीश यांनी आपले विग स्वतः डिझाइन केले होते.

  • चित्रपट हिट ठरल्यानंतर दिला होता 10 हजार रुपयांचा बोनस

हम पांच या चित्रपटातील भूमिकेसाठी अमरीश यांना 40 हजार रुपये मानधन देण्यात आले होते. हा चित्रपट हिट झाल्यानंतर त्यांना बोनस म्हणून 10 हजार रुपये देण्यात आले आणि ते आनंदी झाले. त्याकाळी प्राण आणि व्हिलनची भूमिका साकारणारे इतर कलाकाल 3 लाख रुपये घ्यायचे. मी हा चित्रपट बनवताना त्यांना सांगितले होते की, यानंतर तुमची किंमत वाढून अडीच लाख रुपये होईल. हम पांचच्या आधीही ते चित्रपटांमध्ये  काम करत होते, परंतु हम पांचमुळे त्यांना खरे स्टारडम मिळवून दिले होते. अशाप्रकारे आमची एकत्र आलो होतो. 

  • 'मिस्टर इंडिया'तील भूमिकेसाठी अमरीश यांच्या आधी बर्‍याच कलाकारांनी ऑडिशन दिली होती

आम्हाला मिस्टर इंडियासाठी नवीन चेहरा हवा होता. यासाठी मुंबईत व्हिलनची भूमिका साकारणारे जेवढे कलाकार होते, त्या सगळ्यांची ऑडिशन घेण्यात आली होती. पण जावेद यांनी ज्या पद्धतीने मोगॅम्बोची व्यक्तिरेखा लिहिली होती, त्यासाठी कुणीही योग्य व्यक्ती सापडत नव्हती. म्हणून अखेरीस केवळ अमरीश पुरीच ही व्यक्तिरेखा साकारु शकतील असे आम्हाला वाटले. आम्ही त्यांना सांगितले की, आम्हाला पुढच्या आठवड्यापासून तुमचे 60 दिवस हवे आहेत, कारण क्लायमॅक्सच्या शूटिंगसाठी आर के स्टुडिओमध्ये एकूण 5 सेट्स लागले होते. त्याने लगेच हो म्हटले.

वास्तविक बघता, जेव्हा कलाकारांकडे आम्ही जातो, तेव्हा बघू विचार करु अशी उत्तरे आम्हाला मिळत असतात. ते मला म्हणाले होते की, मी भूमिकेबद्दल मी बरंच ऐकलं आणि अखेर तुम्ही माझ्याजवळ आलात, याचा मला आनंद आहे. तुमच्या ज्या तारखा असतील, त्या तारखेशी मी जुळवून घेईल अशाप्रकारे आम्ही शूटिंगला सुरुवात केली आणि मोठा खलनायक म्हणून अमरीश पुरीचा एक नवीन चेहरा समोर आला. आम्ही त्यांना आमच्या 'हम पांच'मध्ये यासाठी घेतले होते की ते एक नवीन चेहरा आहे. जेव्हा 'शोले'मध्ये अमजद खान लाँच झाले होते, तेव्हा ते अगदी फ्रेश चेहरा होते.

  • मोगॅम्बोसाठी स्वतः डिझाइन केला होता कॉश्च्युम

आम्ही अमरीश पुरींना मोगॅम्बो बनवले, पण त्या पात्रासाठीचा कॉश्च्युम आणि गेटअपविषयीची आयडिया क्लिअर नव्हती. संपूर्ण गेटअप डिझाइन करण्यात अमरीश पुरी यांचा मोठा हात होता. अमरीश यांनी त्यांचा खास टेलर माधवसोबत मिळून संपूर्ण गेटअप डिझाइन केले. त्या पोशाखाने मी इतका प्रभावित झालो की त्यावेळी मी डिझायनर माधव यांना 10,000 रुपये दिले. आमच्याकडे व्हिलनची व्यक्तिरेखा होती, पण स्पष्ट दृश्य नव्हते. हे अमरीशजी यांनी स्वतः बनवले. विग, कॉश्च्युम, हातातील छढी, या सर्व गोष्टी स्वत: अमरिश यांनी माधव यांच्यासमवेत डिझाइन केल्या होत्या.

  • मोगॅम्बोसाठी बरीच तालीम केली

अमरीश पुरींची एक सवय होती, जेव्हा ते रोल करायचे, तेव्हा ते प्रत्येक गोष्टीच्या तपशीलात जात असे आणि मोगॅम्बोच्या प्रत्येक तपशीलात जाऊन त्यांनी आश्चर्यकारक काम केले. या पात्राला पुन्हा जिवंत करण्यासाठी त्यांनी खूप तालीम केली. जावेदजींसोबत बसून प्रत्येक संवाद त्यांनी वाचला होता आणि सेटवर शेखर यांनीही त्यांच्याकडून तालीम करुन घेतली होती. त्यांनी सर्व गोष्टींसाठी खूप कष्ट केले.

  • अमरीश पुरी यांना संपूर्ण क्रेडिट देऊ इच्छितो

नायक तेव्हाच मोठा होतो, जेव्हा त्याच्या समोर खलनायक त्याच्या बरोबरीचा असेल. आम्हाला मिस्टर इंडियासमोर एक मोठा खलनायक हवा होता आणि अमरीश पुरी यांच्यापेक्षा मोठा खलनायक असू शकतो असे मला वाटत नाही. मी अमरीश पुरी यांना संपूर्ण क्रेडिट देऊ इच्छितो. बरं, मोगॅम्बो खूश हुआ ही ओळ जरी जावेदजींनी लिहिली असली, तरी ती अमरीश पुरींनी आपल्या भूमिकेतून अजरामर केली.

  • मोगॅम्बोच्या यशाने आणखी चित्रपट मिळाले

'मिस्टर इंडिया'नंतर आम्ही त्यांच्याबरोबर 'विरासत'मध्ये काम केले. या संपूर्ण प्रोजेक्टचा सेटअप मी केला होता. या चित्रपटात  अमरीशजींनी सकारात्मक भूमिका केली आणि पुन्हा कमालीचे काम केले. 'मिस्टर इंडिया'नंतर त्यांनी हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिथेही मोठ्या चित्रपटांमध्ये ते खलनायक असायचे. हे सर्व मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमांमुळे शक्य झाले होते.

बातम्या आणखी आहेत...