आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉकडाऊनपासून अभिनेते अनुपम खेर सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. खेर यांनी आपले काही मजेशीर व्हिडिओही शेअर केले आहेत, ज्यात त्यांनी कुटुंब आणि फिल्मी करियरशी संबंधित गोष्टी शेअर केल्या. आता अनुपम यांनी इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय खलनायक अमरीश पुरींची आठवण काढून त्यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे.
शुक्रवारी अनुपम यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका मॅगझिनचा कव्हर फोटो शेअर केले असून त्यात ते अमरीश पुरी यांच्यासोबत दिसत आहेत. या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर सर्वौत्कृष्ट खलनायक म्हणून दोघांना स्थान मिळाले होते. ही आठवण सांगताना अनुपम म्हणाले, 'मला तुमची आठवण येतेय अमरीश पुरी जी. ते सर्वात मृदू व्यक्ती होते, मला त्यांच्याशी मैत्री करण्याचा हक्क मिळाला होता. ते खूप शांत आणि लहान मुलांसारखे निरागस होते. असे असूनही, त्यांनी बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये खलनायकाचे कठीण काम केले', असे अनुपम म्हणाले.
View this post on InstagramA post shared by Anupam Kher (@anupampkher) on Jun 25, 2020 at 8:47pm PDT
पुढे त्यांनी लिहिले की, 'सर्वात प्रोफेशनल कलाकारांपैकी ते एक होते. वेळेत काम करणारे आणि शिस्तबद्ध. ते मला नेहमी म्हणायचे की, तू एक न्हॉटी (खोडकर) मुलगा आहेस. त्यांच्याकडून हे ऐकून छान वाटायचं. आणि मी त्यांना उत्तर देताना म्हणायचो, अमरीश जी तुस्सी ग्रेट हो. अमरीशजी तुम्ही नेहमीच महान असाल. एक अभिनेता आणि एक जेंटलमन. थ्रोबॅक फ्रायडे', असे कॅप्शन अनुपम खेर यांनी दिले.
अमरीश पुरी आणि अनुपम खेर हे 80 आणि 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. या दोघांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'सलाखें', 'त्रिदेव', 'आज का अर्जुन', 'मस्त कलंदर', 'मुकद्दार का बादशाह' आणि 'जीने दो' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.