आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बधाई हो:लग्नाच्या चार वर्षांनी आईवडील झाले अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल, मुलाला दिला जन्म

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आई आणि मूल दोघेही बरे आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आई झाली आहे. तिने एका गोड मुलाला जन्म दिला आहे. रविवारी सकाळी अमृताने एका गोंडस बाळाला जन्म दिला. यावेळी तिचा नवरा आरजे अनमोल हा पूर्ण वेळ तिच्यासोबत ऑपरेशन थिएटरमध्ये हजर होता. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आई आणि मूल दोघेही बरे आहेत. अद्याप दोघांनीही सोशल मीडियावर यासंदर्भात कोणतीही पोस्ट अपडेट केलेली नाही.

नवरात्रीत स्वतः दिली होती आनंदाची बातमी
अमृताने काही दिवसांपूर्वी पतीसोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आपण गर्भवती असल्याची आनंदाची बातमी दिली होती. अमृताने गर्भवती असल्याची बातमी चाहत्यांना अगदी 9 महिन्यांत दिली होती. आतापर्यंत अमृताने ही बातमी लपवली होती, मात्र अखेर व्हायरल झालेल्या फोटोनंतर तिने स्वतःच याचा खुलासा केला. अमृताने आपला पती आरजे अनमोलसोबत एक फोटो शेअर केला होता. यात तिने म्हटले होते की, ‘तुमच्यासाठी हा 10 वा महिना आहे, पण आमच्यासाठी हा 9 वा महिना आहे. सरप्राईज, सरप्राईज, सरप्राईज… अनमोल आणि मी आमच्या नवव्या महिन्यात आहोत.’