आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमृता आई होणार आहे:नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर प्रेग्नन्सीच्या 9 व्या महिन्यात अमृता राव म्हणाली, 'आता मी स्वत: आई होणार आहे'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमृताने 2016 मध्ये आरजे अनमोलसोबत लग्न केले होते.

इश्क विश्क, विवाह, आणि मैं हूं ना सारख्या अनेक चित्रपटात झळकलेली अभिनेत्री अमृता रावच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन आहे. अमृता आणि तिचा नवरा अनमोल पहिल्यांदा आई होणार असून या नवीन भूमिकेसाठी दोघेही खूप उत्सुक आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने अमृताने सांगितले की, तिला सध्या नववा महिना सुरु असून जो तिच्यासाठी आशीर्वादाप्रमाणे आहे.

अलीकडेच अमृताने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून बेबी बंपसह स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने एक पोस्ट लिहिली आहे. ''नवरात्री आणि नऊ महिने. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर गर्भधारणेच्या नवव्या महिन्यात मी आले आहे, याचा मला आनंद झाला आहे. हे 9 दिवस माँ दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना समर्पित आहेत आणि आता मी स्वत: आई होणार असून आयुष्याच्या नवीन टप्प्यात प्रवेश करणार आहे. मी या विश्वातील महिलांच्या सर्वोच्च ऊर्जेला नमन करते''.

अमृता पुढे लिहिते, 'माँ दुर्गा प्रत्येक आईला शक्ती देवो आणि मातृत्वात येणा-या प्रत्येक पवित्र अवतार काय ठेवण्यासाठी अधिक शक्ती देवो. आपणा सर्वांना अष्टमीच्या शुभेच्छा'.

अमृताने 2016 मध्ये आरजे अनमोलसोबत लग्न केले होते. हे दोघेही हा काळ एन्जॉय करत आहेत. एका मुलाखतीत अमृताने सांगितले की, प्रेग्नन्सीच्या काळात अनमोल तिची खूप काळजी घेतोय. दैनिक भास्करसोबतच्या बातचीतमध्ये अनमोलने सांगितले की, नियमित रक्त तपासणी दरम्यान अमृताच्या गरोदरपणाबद्दल आम्हाला समजले. अमृता आई होणार असल्याचे ऐकून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अनमोलने सांगितल्यानुसार, मला रक्त तपासणी करायची होती ज्यासाठी डॉक्टर घरी आले होते. यावेळी आम्ही अमृताचीही रक्त तपासणी केली. हा रिपोर्ट आल्यावर समजले की ती प्रेग्नंट आहे. ही बातमी मिळताच एका आठवड्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळाली.