आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता फडणवीस यांच्याकडून नवीन वर्षाची सुरेल भेट:लवकरच नवे गाणे होणार रिलीज

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक नवे गाणे लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. स्वतः अमृता फडणवीस यांनी याची माहिती दिली आहे. सोशल मीडियावरून अमृता यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला नव्या गाण्याची भेट

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. त्यांच्याविषयीचे नवनवे अपडेटस त्या सातत्याने सोशल मीडियावरून शेअर करत असतात. सोमवारी त्यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या नव्या गाण्याविषयी माहिती दिली. त्यांचे 'अज मैं मूड बणा लेया ए ए ए , तेरे नाल ही नचणा वे !!' असे बोल असलेले नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे एक बॅचलरेट अँथम असणार आहे.

6 जानेवारीला रिलीज होणार

येत्या 6 जानेवारी रोजी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येईल. टी-सीरिजवर हे गाणे उपलब्ध असेल. टी-सीरिजच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही या गाण्याचा खास टीझर शेअर करण्यात आला आहे.

अमृता फडणवीस यांच्या लूकची चर्चा

या गाण्यातील अमृता फडणवीस यांच्या लूकचा फोटोही सोबत शेअर करण्यात आला आहे. यात त्या निळी जिन्स आणि पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसतात. यावर त्यांनी गुलाबी रंगाचा ओव्हरकोट परिधान केला आहे. सोबत या ट्रेंडी लूकसोबत त्यांनी पारंपरिक दागिन्यांचे फ्युजन आपल्या लूकला दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या या नव्या लूकचीही बरिच चर्चा बघायला मिळत आहे.

हे वृत्तही वाचा...

2023 मध्ये 20पेक्षा जास्त बिग बजेट चित्रपट:पठाण, आदिपुरुष आणि डंकी होणार रिलीज; OTT वर मिर्झापूर, महाराणी, फॅमिली मॅनचे तिसरे पर्व

बातम्या आणखी आहेत...