आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आज मैंने मूड बना लिया है...':अमृता फडणवीसांचे नवीन गाणे रिलीज, पंजाबी साँग तुम्हालाही लावेल वेड

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस नवीन वर्षात त्यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आल्या आहेत. यंदा त्या पंजाबी मूडमध्ये दिसत आहेत. अमृता फडणवीसांच्या या नव्या गाण्याचे बोल ‘आज मैं मूड बना लिया’ असे आहेत. या गाण्याचा व्हिडिओ आज रिलीज करण्यात आला आहे. बॅचलर्सवर हे गाणे आधारित आहे. नवीन गाण्यात अमृता गाण्याबरोबरच डान्सही करताना दिसत आहेत.

टी सिरीजच्या या गाण्याचा टिझर 5 जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासून चाहते या गाण्याची वाट पाहात होते. तसेच अमृता फडणवीस यांनीही तीन दिवसांपूर्वी त्यांच्या नवीन गाण्याचे पोस्टर सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले होते.

अमृता फडणवीस या एक बॅंकर असून त्यांना गायनाची आवड आहे. त्यांनी आतापर्यंत बरीच गाणी गायली असून त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली आहे.

  • अमृता फडणवीसांच्या 'मूड बणा लेया...' गाण्याचा टिझर रिलीज:उद्या येणार पूर्ण गाणे, बघा लक्ष वेधून घेणारा Teaser

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांच्या पंजाबी गाण्याचा टिझर आज रिलीज झाला आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांनी नवीन नवीन वर्षात नवीन गाणे घेऊन येत असल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. 'आज मैं मूड बणा लेया ए ए ए , तेरे नाल ही नचणा वे !!' असे या गाण्याचे बोल आहे. टिझरमध्ये अमृता यांचा दिलखेचक अंदाज लक्ष वेधून घेतोय. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...