आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता फडणवीसांच्या 'मूड बणा लेया...' गाण्याचा टिझर रिलीज:उद्या येणार पूर्ण गाणे, बघा लक्ष वेधून घेणारा Teaser

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांच्या पंजाबी गाण्याचा टिझर आज रिलीज झाला आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांनी नवीन नवीन वर्षात नवीन गाणे घेऊन येत असल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. 'आज मैं मूड बणा लेया ए ए ए , तेरे नाल ही नचणा वे !!' असे या गाण्याचे बोल आहे. टिझरमध्ये अमृता यांचा दिलखेचक अंदाज लक्ष वेधून घेतोय.

अमृता पहिल्यांदाच एका पंजाबी गाण्याच्या निमित्ताने चाहत्यांच्या भेटीला आल्या आहेत. गाण्याचा टिझर चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. चाहते त्यांच्या या नवीन लूकचे कौतुक करत आहेत.

6 जानेवारीला रिलीज होणार आहे पूर्ण गाणे

येत्या 6 जानेवारी रोजी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येईल. टी-सीरिजवर हे गाणे उपलब्ध असेल. टी-सीरिजच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही या गाण्याचा खास टिझर शेअर करण्यात आला आहे.

अमृता फडणवीस यांच्या लूकची चर्चा
अमृता फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी या गाण्यातील त्यांच्या लूकचा फोटो शेअर केला होता. यात त्या निळी जिन्स आणि पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसतात. यावर त्यांनी गुलाबी रंगाचा ओव्हरकोट परिधान केला आहे. सोबत या ट्रेंडी लूकसोबत त्यांनी पारंपरिक दागिन्यांचे फ्युजन आपल्या लूकला दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या या नव्या लूकचीही बरीच चर्चा बघायला मिळाली.

  • अमृता फडणवीस यांच्याकडून नवीन वर्षाची सुरेल भेट:लवकरच नवे गाणे होणार रिलीज

नवीन वर्षाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक नवे गाणे लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. स्वतः अमृता फडणवीस यांनी याची माहिती दिली आहे. सोशल मीडियावरून अमृता यांनी याबद्दल माहिती दिली आहे. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...