आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्रजींना गाणे आवडले, पण ते ट्रोलिंगला घाबरले:अमृता फडणवीस म्हणाल्या - उर्फीलाही माझ्या गाण्यावर नाचवा; गाणे गाजेल हा विश्वास

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे मूड बनालेया हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रत्येक लग्नात वाजवले जाईल असा विश्वास अमृता फडणवीस यांनी गाण्याच्या लॉन्च सोहळ्यादरम्यान बोलताना व्यक्त केला.

मूड बनालेया या गाण्याचा लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात पत्रकारांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. हे गाणे प्रत्येक लग्नात वाजेल असा विश्वास आपल्याला असल्याचे अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.

प्रत्येक लग्नात वाजेल गाणे

त्या म्हणाल्या की, 'हे एक बॅचलरेट अँथम आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की हे गाणे प्रत्येक लग्नात वाजवले जाईल. जिथे गॅदरिंग आहे तिथे वाजवले जाईल. ज्यांना रिलॅक्स व्हायचे आहे, फ्रेश व्हायचे आहे त्यांनी गाणे लावून डान्स करावा किंवा गुणगुणावे, ते एकदम फ्रेश होतील. तुम्हीही वाटल्यास ट्राय करून पाहा.'

देवेंद्रजी ट्रोलिंगला घाबरले

देवेंद्र फडणवीस यांना हे गाणे आवडले असेही अमृता फडणवीस यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. त्यांचाही नाचण्याचा मूड झाला होता का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते ट्रोलिंगला घाबरले असे उत्तर अमृता फडणवीस यांनी दिले.

उर्फीलाही या गाण्यावर नाचवा

उर्फी जावेदविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, आज फक्त या गाण्याविषयीच बोलुया. मात्र याचे उत्तर मी तुम्हाला नंतर नक्कीच देईल. आज या गाण्यावर सगळ्यांना नाचवा. उर्फीलाही या गाण्यावर नाचवा असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...