आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आता मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे जलसामधील एका कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिले की, ते सध्या घरच्या कोविड परिस्थितीशी झुंज देत आहेत आणि नंतर चाहत्यांशी संपर्क साधतील. मात्र जलसामध्ये 79 वर्षीय अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंबीय सुखरूप आहेत.
अमिताभ यांच्या प्रतीक्षा आणि जलसा या दोन्ही बंगल्यातील कर्मचार्यांची कोविड चाचणी झाली, ज्यामध्ये एकाला कोरोनाची लागण झाली. या सदस्याला BMC ने कोविड केअर सेंटर 2 मध्ये आयसोलेट केले आहे.
रुटीन चेकअपदरम्यान एक सदस्य पॉझिटिव्ह
मुंबई बीएमसीचे आरोग्य अधिकारी अजित पंपाटवार यांनी दिव्य मराठीला सांगितल्यानुसार, अमिताभ यांच्या घरी एकूण 31 कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी एक पॉझिटिव्ह आला आहे. मात्र तो अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कात आला नाही. त्यांनी सांगितले की, ही तपासणी नियमित तपासणी अंतर्गत करण्यात आली आहे. मुंबईतील कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता खबरदारी म्हणून सेलिब्रिटी आपल्या कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करून घेत आहेत.
याआधी गेल्या वर्षी जुलैमध्ये अमिताभ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यामुळे त्यांना मुंबईतील विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. अमिताभ यांच्यानंतर त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
अमिताभ आपल्या ब्लॉगवर वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटना शेअर करत असतात. मंगळवारी रात्री त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांनी लिहिले की, त्यांच्या घरी कोविड रुग्ण आढळला असून ते नंतर चाहत्यांसोबत जुळतील.
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र आहे. टीव्ही आणि बॉलिवूडचे कलाकार पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे. टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी, अभिनेता नकुल मेहता, त्याची पत्नी आणि 11 महिन्यांचा मुलगा सुफी यांना कोरोनाची लागण झाली. याशिवाय निर्माती एकता कपूर, डेलनाज इराणी, अर्जुन बिजलानी हे सेलिब्रिटीदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले. तर बॉलिवूडमध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा, अर्जुन कपूर, नोरा फतेही, रिया कपूर, अंशुला कपूर, शिल्पा शिरोडकरला यांनाही कोरोनाची लागण झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.