आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:एसआयटीमार्फत चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, भाजपचे सुब्रमण्यम स्वामी म्हणतात- सुशांतला ठार मारण्यात आले

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्या दाव्याची पुष्टी करण्यासाठी भाजप खासदार स्वामी यांनी कागदपत्रे समोर मांडली आहेत.
  • पोलिस चौकशीत सुशांतची बहीण मीतू यांनी सुशांत आणि रियाचे भांडण झाल्याचे सांगितले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यात कोर्टाच्या देखरेखीखाली एखाद्या स्वतंत्र एजन्सी किंवा एसआयटीकडून सुशांतच्या मृत्यूची चौकशी व्हावी यासाठी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतील स्वयंसेवी संस्था 'लेट्स टॉक' यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.

आरुषी तलवारसारख्या घटनांचा उल्लेख करत या एनजीओने सुशांतची आत्महत्या आणि रिया चक्रवर्तीच्या भूमिकेबद्दल सवाल उपस्थित केला आहे. दुसरीकडे, भाजप खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करून सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा दावा केला आहे. तर याच वेळी सुशांतची बहीण मीतू यांनी त्यांच्या चौकशीतून अनेक बाबी उघड केल्या आहेत.

  • सुशांतच्या वडिलांचे वकील कॅव्हिएट दाखल करतील

सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पाटण्यातील खटला मुंबईत वर्ग करावा अशी मागणी केली आहे. दुसरीकडे सुशांतच्या वडिलांच्या वतीने वकील विकास सिंह हेदेखील कॅव्हेट दाखल करतील. विकास सिंह यांच्या म्हणण्यानुसार, ते रियाच्या याचिकेत उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कोर्टात देतील.

  • सुशांतने रियासोबतच्या भाांडणाची माहिती बहिणीला दिली होती

पोलिसांनी सुशांतची बहीण मीतू सिंहची चौकशी केली, त्यात तिने अनेक खुलासे केले आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मीतू सिंहने सांगितले की, 8 जूनच्या संध्याकाळी तिला रिया आणि सुशांतच्या भांडणाची माहिती मिळाली. दुसर्‍याच दिवशी ती काही दिवसांसाठी वांद्रे येथील सुशांतच्या घरी रवाना झाली. मीतू म्हणाली की, सुशांतने तिला रियाबरोबर झालेल्या वादाबद्दल सांगितले होते. सुशांतने तिला हेही सांगितले की, रिया स्वत:चे आणि त्याचे काही सामान घेऊन घरुन निघून गेली आहे. आणि कदाचित तिला परतायचे नाही. यामुळे सुशांत खूप नाराज झाला होता.

मीतू म्हणाली, "मी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मी सुशांतसोबत चार दिवस त्याच्या घरीदेखील थांबले. माझी मुले लहान आहेत. म्हणून मी 12 जून रोजी माझ्या घरी परतले. परत येतानासुद्धा मी सुशांतला समजावण्याचा प्रयत्न केला. मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की, सुशांत असे काही पाऊल उचलेल. दोन दिवसानंतर मला सिद्धार्थ पठानी यांनी फोन केला आणि सांगितले की सुशांत ब-याच वेळापासून आपल्या बेडरूमचा दरवाजा उघडत नव्हता, मी लगेच वांद्र्याला निघाले. वाटेत त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. "

  • सुब्रमण्यम स्वामी यांनी 26 पॉईंटचे डॉक्युमेंट शेअर केले

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन सांगितले की, सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली? असे त्यांना का वाटले? ट्विटमध्ये त्यांनी एक डॉक्युमेंट शेअर केले आहे. सुशांतच्या गळ्यावर एक खुण आढळली होती, त्यावरुन त्याने आत्महत्या केल्याचे दर्शवत नाहीत.

स्वामींनी जे डॉक्युमेंट शेअर केले आहेत, त्यात सुशांतशी संबंधित त्यांनी 26 मुद्दे मांडले आहेत. त्यांचा दावा आहे की, यापैकी केवळ 2 मुद्दे आत्महत्येबाबत स्पष्टीकरण देत असून इतर 24 मुद्दे हत्येबाबतचे संकेत देतात.