आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • An Offence Registered At Santacruz Police Station Against Two Instagram Account Holders For Sending Obscene Messages And Threatening Rhea Chakraborty

धमकीवर कारवाई:रिया चक्रवर्तीने शेअर केला होता इंस्टाग्रामवर मिळालेल्या रेप-मर्डरच्या धमकीचा स्क्रीन शॉट, मुंबई पोलिसांनी दोन अकाउंट होल्डर्सवर दाखल केला एफआयआर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह  राजपूतच्या मृत्यूच्या महिन्याभरानंतर 14 जुलैला एक पोस्ट केली होती. रियाच्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होताच ट्रोलर्सही सक्रिय झाले होते. यामधील काहींनी सुशांतच्या मृत्यूला रिया जबाबदार असल्याचे म्हटले होते. काहींनी तिला रेप-मर्डरची धमकी दिली होती. याचा स्क्रीन शॉट तिने इंस्टग्रामवर शेअर केला होता. रियाने याप्रकरणात मुंबई पोलिस सायबर क्राइमला लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर सांताक्रूज पोलिस स्टेशनमध्ये दोन इंस्टग्राम अकाउंट्सवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

सुशांतच्या मृत्यूशी संबंधित प्रकरण

वृत्तसंस्था एएनआयनुसार- मुंबई पोलिसांच्या झोन 9 चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले की, रिया चक्रवर्ती यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी वांद्रे पोलिसांनी सुमारे 11 तास रियाकडे विचारपूस केली. तिच्यावर केले जाणारे सवाल पाहून रियाने स्वत: सोशल मीडियावर गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सुशांतच्या मृत्यूबद्दल सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

रियाने ट्रोलरद्वारे मिळालेल्या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. मन्नू राऊत नावाच्या या ट्रोलरच्या डीपीमध्ये एका महिलेचा फोटो लावलेला दिसतोय. रियाला मॅसेज करत लिहिले होते की, तुझ्यावर बलात्कार होईल की, तुझी हत्या होईल हे मी निश्चित करेल, तु आत्महत्या करुन घे किंवा लवकरच मी तुला जीवे मारण्यासाठी लोकांना पाठवेल. 

रियाने ट्रोलरला दिले चोख प्रत्युत्तर 
रियाने या ट्रोलरला प्रत्युत्तर देऊन लिहिले होते की, मला गोल्ड डिगर म्हटले होते, मी गप्प बसले. मला खुनी म्हणतात, मी गप्प बसले. परंतु माझ्या शांत बसण्याने आपल्याला हा अधिकार कसा दिला की, तुम्ही माझ्यावर बलात्कार कराल किंवा खून कराल? आपण जे बोललात त्याबद्दलचे गांभीर्य आपल्याला समजते का? हा गुन्हा आहे आणि कायद्यानुसार कोणीही नाही, मी पुन्हा सांगते की, कोणीही अशा प्रकारचे विष पसरवू शकत नाही आणि छळही करू शकत नाही. मी @cyber_crime_helpline @cybercrimeindia ला मागणी करते की, त्यांनी अवश्य कारवाई करावी. आता खूप झाले. '

बातम्या आणखी आहेत...